Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

देशासाठी काम करणारे श्वानांचे निवृत्ती नंतर काय होते..जाणून घेऊ या.....

देशासाठी काम करणारे श्वानांचे निवृत्ती नंतर काय होते..जाणून घेऊ या.....
, गुरूवार, 19 मार्च 2020 (18:38 IST)
श्वान (कुत्रा) हा एक विश्वासू प्राणी समजला जातो. हा आपल्या मालकासाठी निष्ठावान असतो. योग्य शिकवण दिल्यास हा आपल्या सर्व गोष्टी समजतो. घरात पण हा समजूतदारीने  वागत असतो. कुत्रा हा अत्यंत हुशार आणि चपळ प्राणी आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या मालकाशी प्रामाणिक असतो. कुत्र्याला योग्य ट्रेनिंग दिल्यास गुन्हेगारांना पण शोधून काढतो  आणि पोलिसांची मदत करतो. 
 
पोलीस विभागाद्वारे श्वानांना देशाच्या सेवे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी पण मदत घेतली जाते. सैन्यामध्ये माणसांबरोबर हे श्वान देखील देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर  असतात. अनेकदा कुत्र्याने स्वतःच्या प्राणांचे त्याग करून एखाद्या सैनिकांचे प्राण वाचवले आहे. सैन्यामध्ये ह्यांचे कार्य बॉम्ब, दारुगोळे आणि दहशतवादींचे ठिकाणांचा शोध करण्यात  सैन्याची मदत करणे आहे. अश्या प्रकारे ते देशाच्या कामीपण येतात आणि सैन्याची मदत करतात. 
 
सैन्यामधून निवृत्त झाल्यावर ह्यांचे काय होते हे एकल्यावरच आपण थक्क व्हाल. त्यांना सैन्यातून निवृत्त केल्यावर सैन्याकडूनच ठार मारण्यात येते. ह्या मागचे विशिष्ट कारण  आहे.
भारतीय सैन्यामध्ये तीन प्रकारच्या जातींच्या कुत्र्यांचा समावेश केला जातो. लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड आणि बेल्जीयम शेफर्ड. सैन्यात ज्या दिवशी ते शामिल होतात त्या  दिवसापासूनच त्यांचा राहण्याची आणि खाण्यापिण्याची तसेच त्यांचा सुरक्षे संदर्भात सर्व प्रकारांची काळजी घेतली जाते. जेव्हा एखाद्या कुत्रा एक महिन्यापेक्षा जास्त आजारी झाला  किंवा आपली ड्युटी योग्य प्रकाराने करू शकत नसल्यावर कुत्र्याला प्राणाचे विष देऊन मारून टाकले जाते.
 
 
कुत्र्यांना निवृत्ती नंतर मारून टाकण्याचे मूळ कारण असे की या कुत्र्यांना सैन्याच्या बेस लोकेशनची पूर्ण माहिती असल्याने त्या गुप्त गोष्टींची माहिती सामान्य माणसांना लागू नये. त्यासाठी हे कुत्रे सामान्य माणसांना देत नसून त्यांना मारून टाकतात. अन्यथा हा सैन्याच्या सुरक्षेला धोका असू शकतो. हे टाळण्यासाठी सैन्याला असा निर्णय घेणे गरजेचे असते. मारण्यापूर्वी त्यांना सन्मान दिले जाते. त्यांचा कार्यासाठी आदरांजली दिली जाते आणि हे कठोर पाउल घेतली जाते. भारतीय सैन्याच्या ह्या विश्वासू प्राण्यांच्या कारकिर्दीला सलाम....
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करोना व्हायरसमुळे भारतात चौथा मृत्यू