मुंबई: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यातील महाविद्यालेय सुरु करण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महाविद्यालये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे दिवाळीनंतर सुरु होईल असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले आहे.
राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून या पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली होती. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार येत्या नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे.
सीईटी परीक्षा झाल्यानंतर राज्यातील सर्व महाविद्यालय सुरु करण्यावर वाटचाल सुरु आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील महाविद्यालय़े सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॉलेज ऑनलाईन की ऑफलाईन हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत, अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.