Marathi Biodata Maker
✕

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र राज्यात कधी येणार?

Webdunia
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:45 IST)
विधानसभेच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात भाजपला धारेवर धरले. उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करुन इतर देशातील हिंदूंसाठी इथले दरवाजे उघडत आहे. त्याला आमचा विरोध नाही. काश्मिीरी हिंदू पहिल्यांदा  भारतात आले तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आसरा दिला होता.
 
परंतु इतर देशातले जे हिंदू भारतात येतील, त्यांची काळजी कोण वाहणार आहे? भाजप जसा इतर देशातल्या 
हिंदूंचा विचार करत आहे. तसा बेळगावातल्या हिंदूंचा विचार करणार का? असे अनेक सवाल उद्धव ठाकरे
यांनी उपस्थित केले. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर भागातील हिंदूंच्या प्रश्नांचे काय? बेळगावातले
लोक हिंदू नाहीत का? बेळगावातले मराठी बांधव आक्रोश करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात यायचे आहे. हा प्रश्न कधी सुटणार. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.
 
कर्नाटकचे मुख्यमं‍त्री भाजप नेते येडियुरप्पा यांनी नुकतेच तिथे बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपने
पुढाकार घेऊन बेळगाव प्रश्न सोडवावा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

नवीन

१९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ज्युनियर सेहवाग आणि ज्युनियर द्रविड यांना संधी

महाराष्ट्रात ३ वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बस धावणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभ महोत्सवाचे उद्घाटन करतील

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळाचा भव्य ध्वजारोहण सोहळा; मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

LIVE: महाराष्ट्र सरकार पुढील तीन वर्षांत ५०,००० इलेक्ट्रिक बसेस आणणार

पुढील लेख
Show comments