Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवाब मलिक यांचे NCB वर गौप्य स्फोट,फ्लेचर पटेल कोण आहे? याचा खुलासा द्यावा

Who is Nawab Malik's secret blast on NCB
, शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (14:07 IST)
सध्या NCB ने क्रूज ड्रग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी NCB ने केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करून आणखी एक गौप्य स्फोट केले आहे.आमचे साक्षीदार स्वतंत्र असतात असे एन सीबी ने सांगितले असताना हे फ्लेचर पटेल कोण आहे आणि त्यांचा NCB चे समीर वानखेडे यांच्याशी काय संबंध आहे.असे त्यांनी पत्रकार परिषद मध्ये प्रश्न विचारले आहे.याचे स्पष्टीकरण NCB ने द्यावे .25 नोव्हेंबर ला एका सर्च ऑपरेशन मध्ये केलेल्या पंचनाम्यात फ्लेचर पटेल हे पंच आहे. आणखी एका 9 डिसेंबर2020 रोजी झालेल्या  पंचनाम्यात पंचांपैकी एक पंच फ्लेचर पटेल आहे.2 जानेवरी 2021 रोजी झालेल्या एका कारवाई मध्ये देखील पंच फ्लेचर पटेल आहे.कुटुंबियांसमवेत असलेल्या फोटो मध्ये देखील फ्लेचर पटेल असतात.अखेर समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलचा आपसात काय संबंध आहे हे NCB ने सांगावे.हे सगळे पंचनामे आणि कारवाई ठरवून केलेली असते.पंच देखील जवळचे आणि ठराविक असतात. छापेमारीच्या तिन्ही कारवाईमध्ये पंच फ्लेचर पटेल आहे.ही सगळी  कारवाई ठरवून केल्याचे आढळून येतं.असे मलिक म्हणाले.
 
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना NCB ने ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या जावई समीर खान यांना 200 किलो ड्रग्ज सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. माझे जावई ड्रग्ज रॅकेट चालवतात असे सांगण्यात आले. त्यावेळी NCB कडून कारवाई करण्याचे फोटो समीर वानखेडे यांच्या व्हाट्सअप नंबर वरून पाठविण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार जावई कडे  200 किलो ड्रग्ज नसल्याचे सिद्ध झाले.या आरोपामुळे  जावई तुरुंगात होते.
 
या घटनेमुळे कुटुंबाला मनस्तापाला सामोरी जावे लागले.वानखेडे यांच्या  पब्लिसिटीसाठी ते अनेक कार्यक्रम आयोजित करतात.समीर वानखेडे यांच्या समवेत फ्लेचर पटेल यांचे फोटो असतात. त्याचा अर्थ काय ?असा आरोप देखील मलिक यांनी केला आहे.
 
नवाब मालिक यांनी क्रूझ वरील ड्रग्ज प्रकरणी NCB ने केलेली कारवाई बोगस असल्याचे दावे  करून NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळ उडवली आहे. या कारवाईत भाजपचे काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी उघड केले आहे. हे सर्व त्यांनी एका ट्विटच्या माध्यमाने सांगितले असून पुन्हा एकदा NCB ला उघड पाडण्याचा इशारा दिला आहे.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वयाच्या 29 व्या वर्षी क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन,क्रिकेट जगात शोककळा