Festival Posters
✕

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? सुनावणी बाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (20:53 IST)
राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह कोणाचे? हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

दरम्यान, या सुनावणीबाबत शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांचा कोणी काका-मामा राजकारणात नव्हता. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष काढला आहे. यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला.

या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण आहे? तर, तो चेहरा म्हणजे शरद पवार, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता त्यांचा पक्ष ओरबाडू पाहत आहेत. त्यासाठी काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाची नोटीस त्यांनी पाठवली, आम्ही अशी नोटीस पाठवली नाही. त्यामुळे पहिला वार त्यांनी केला, आम्ही केला नाही.
 
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे झाल्यानंतर निवडणूक आयोगासमोर आपल्या पक्षाबाबत चर्चा होती. शरद पवार स्वतः तिथे हजर होते. 83 वर्षांचे शरद पवार यासाठीच मुंबईवरून दिल्लीला गेले. स्वतः ज्या बाळाला जन्म दिला, त्या बाळासाठी शरद पवार तिथे जाऊन बसले. परंतु, ज्यांना पक्ष हवा आहे, ते लोक तिथे नव्हते. त्यांच्यापैकी कोणीच तिथे आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील ते मी बघणार आहे आणि मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण तो वकील काय म्हणाला? ‘तो शरद पवार’ असा उल्लेख त्याने केला.
 
सुप्रिया सुळे या वकिलाला उद्देशून म्हणाल्या, शरद पवारांना ‘तो शरद पवार’ म्हणणारा तू कोण आहेस? आता वकिली कर, तुझा करेक्ट कार्यक्रम आज ना उद्या नाही केला, तर शरद पवाराची मुलगी नाव नाय लावणार, लक्षात ठेव.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे मिळणार

अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की कट? तपास जलदगतीने करण्यासाठी फडणवीस यांनी अमित शाह यांच्याकडे मदत मागितली

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

महाराष्ट्र सरकारचा मोठा उपक्रम; महिला कैद्यांसाठी खुल्या तुरुंग वसाहती, जिथे पात्र कैदी त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकतील

पुढील लेख
Show comments