विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पिय अधिवेशन २७
फेब्रुवारी २०२३ रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.हिवाळी अधिवेशनात बारा विधेयके मंजूर; दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज झाले.
दोन वर्षानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाचे ( Winter session 2022 End ) आज सूप वाजले. यावेळेस विधानसभा कामकाजाचा आढावा घेतला असता, दहा दिवसांमध्ये ८४ तास कामकाज झाले. यामध्ये लक्षवेधी, तारांकित प्रश्न यासह बारा विधेयक मंजूर ( Twelve bills passed in winter session ) झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) दिली.
Edited By- Ratnadeep Ranshoor