Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा ट्रेलर लाँच

shivsena
, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:02 IST)
शिवसेना कुणाची हाच प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर केला असला, तरी राजकीय आखाड्यातही पक्षावरील मालकी सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटा आमनेसामने आले आहेत. याचाच भाग म्हणून दोन्ही गटांनी बाळासाहेब ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेवर दावा केलाय. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला. आता ठाकरे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा ट्रेलर लाँच केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे.
शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्वीट करताना म्हटलं आहे, “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना  एक नेता, एक झेंडा, एक मैदान... 
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.   असं आवाहन केलं.
 
Edited By - Ratandeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Afghanistan: काबूलमध्ये पुन्हा आत्मघाती हल्ला, 19 ठार