Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांचा तमाम महिला वर्गाला महत्वाचा संदेश

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (15:58 IST)
'जागतिक महिला दिन' साठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महिला वर्गाला महत्वाचा संदेश दिला आहे. यात ते लिहितात ....
 
८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही.  आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो. 
 
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही. 
 
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता. 
बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.  
आपला नम्र,
राज ठाकरे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर

Ahoi Ashtami Katha : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अहोई अष्टमी व्रताची कहाणी नक्की वाचा

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Parenting Tips :मुलामध्ये चांगल्या सवयी वाढवण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

सर्व पहा

नवीन

अनैतिक संबंधातून 8 वर्षाच्या मुलाची हत्या

तिरुपतीतील तीन हॉटेल मध्ये बॉम्ब धमकी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे माजी नेते यांचा NCP मध्ये प्रवेश

विधानसभा निवडणुकीसाठी NCP ची 7 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

एकाच कुटुंबातील चार जणांचा तलावात बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments