janma asthmi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 12 August 2025
webdunia

दहावीच्या परीक्षेची तयारी

X exam preparation दहावीच्या परीक्षेची तयारी Marathi Regional News In Webdunia Marathi
, सोमवार, 14 मार्च 2022 (17:03 IST)
यंदा इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च मंगळवार पासून सुरु आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र त्यांचीच शाळा असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एक तास आधी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुभावामुळे मुलांच्या परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. यंदाच्या वर्षी 10 वी ची परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रा पर्यंत जाण्याची कोणतीही अडचण येऊ नये. या साठी यंदा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून शाळा तेथे केंद्र म्हणजे मुलांची शाळाच त्यांचे परीक्षा केंद्र  असणार. या साठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या एक तास आधी पोहोचावे लागणार. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्या साठी परीक्षा केंद्रावर थर्मल स्क्रिनींग साठी आणि सेनेटायजेशन सुविधेसाठी लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. 
 
तसेच विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच जास्तीची वेळ देण्यात देण्यात आली आहे. या साठी पेपर सुरु होण्याच्या अर्धा तासापूर्वी विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येईल. तर प्रश्न पत्रिका 10 मिनिटा पूर्वी वाटप केल्या जातील. विद्यार्थ्यांना 70 ते 100 गुणांचा पेपरसाठी अर्धा तास जास्तीचा तर 40 ते 60 गुणांचा पेपर साठी 20 मिनिटे जास्तीचा वेळ देण्यात आला आहे.  
 
सध्या एसटीचा संप असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणतीही अडचण येऊ नये या साठी शिक्षकांनी, सामाजिक कार्यकर्त्ये आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांची मदत करावी. 
यंदा परीक्षेतील प्रश्न पत्रिकेत वस्तुनिष्ठ पर्यायी प्रश्न, लघुत्तरीय आणि दीर्घात्तरीया प्रश्नांचा समावेश असेल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतातील नंबर 1 SUV वर मिळत आहे शानदार डिस्काउंट