Festival Posters

मुक्त विद्यापीठ : प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (08:59 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या सुरु असलेल्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश २७ जूनपासून सुरु करण्यात आले आहेत. मात्र राज्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता १४ ऑगस्ट पर्यंत विनाविलंब शुल्कासह असलेली मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत (कृषिविज्ञान विद्याशाखेचे शिक्षणक्रम आणि बी.एड. शिक्षणक्रम वगळून) सर्व शिक्षणक्रमांसाठी वाढविण्यात आली आहे.
 
याशिवाय विद्यार्थ्यांना रुपये शंभर विनाविलंब शुल्कासह दि. १ ते १५ सप्टेंबर पर्यंत तर रुपये पाचशे सह दि. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जात असून विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार नाही असे विद्यार्थी स्वतः सायबर कॅफेच्या माध्यामतूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. मुक्त विद्यापीठाची राज्यात ८ विभागीय केंद्रे कार्यरत असून तेथेही प्रवेश घेण्यासाठी मदत मिळू शकते. शिक्षणक्रमांच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou. digitaluniversity.acअथवा ycmou .ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यापीठाने दिलेल्या वाढीव प्रवेश मुदतीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. प्रकाश अतकरे यांनी केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात गुगल मॅपच्या नादात कुटुंब कोसळलं नाल्यात

भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी नियम बदललेले; आता व्हीआयपी प्रवेश नाही

२० हजारांच्या बजेटमध्ये ३ बेस्ट स्मार्टफोन्स, ७०००mAh बॅटरी और गेमिंग प्रोसेसरचे दमदार कॉम्बो

The monsoon session महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून पासून होणार

पुढील लेख
Show comments