Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साताऱ्यात तलवारीने वार करून तरुणाची निर्घृण हत्या

Young man brutally killed by sword in Satara Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
, सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (11:43 IST)
साताऱ्या जिल्ह्याच्या कराड येथे एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड घालून तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला.रमेश रामचन्द्र पवार असे या मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.40 वर्षीय रमेश कोरगाव तालुकातील आर्वी येथील रहिवासी होता.त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे.रात्रीच्या वेळेस आपल्या घरी जीपने जात असताना रमेश यांना चार जणांनी रास्ता अडवून जीप मधून बाहेर काढले आणि त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यावर तलवारीने सपासप वार केले.या हल्ल्यात रक्ताचे थारोळे उडाले.त्या थारोळ्यात रमेश जागीच पडून त्याचा मृत्यू झाला.
रमेशचे गावातील एका महिले सह अनैतिक संबंध होते.या कारणावरून रमेशचे खून झाल्याचे समजले आहे.यावरून त्याचे वाद दीपक इंगळेशी झाले होते.या प्रकरणी दीपक इंगळे,संदीप इंगळे,आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस घटनेचा तपास करत आहे.या घटनेमुळे कराड परिसरात खळबळ उडाली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हैदराबाद Vs राजस्थान : रॉयल्सकडे सॅमसन आणि लोमर, कॅप्टन केन आणि होल्डर SRH साठी महत्वाचे