राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून या वर्षापासून बारावीच्या गुणपत्रिका वेबसाईटवरच पहायला मिळणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागणार असून, निकालाच्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासूनच गुणपत्रिका मिळणार आहेत. बोर्डाच्या www.mah.nic.in/msec या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका पाहता येणार आहेत.
यावर्षी हा निकाल ऑनलाईन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निकाल तयार असून, गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे. ऑनलाईन निकाल जाहीर करून गुणपत्रिका चार-पाच दिवसांनी संबंधित महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले.