Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिले आहे का?’ : संजय राऊत

Sharad Pawar
, गुरूवार, 7 एप्रिल 2022 (21:13 IST)
‘शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असे आपण वारंवार सांगत होतो असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी लगावला. यावर संजय राऊत प्रत्युत्तर देत म्हणाले की, ‘मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिले आहे का?’
 
चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक तुरुंगात गेले. परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीने चौकशी केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली. केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांवर कारवाया केल्या त्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधानांना भेटून हा अन्याय आहे आणि तो थांबवा असे सांगायचे सुचले नाही. परंतु, इतरांच्या बाबतीत निरीच्छ असणारे शरद पवार मात्र संजय राऊत यांच्या गळ्याशी प्रकरण आल्यानंतर मोदीजींची भेट घेतात. याच्यावरूनच आपण संजय राऊत यांच्याविषयी जे बोलत होतो ते स्पष्ट होते.’
 
चंद्रकांत पाटलांच्या या टोल्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिले आहे का? मी शिवसेनेत असल्यापासून शरद पवार यांच्यासोबत माझे घनिष्ठ, प्रेमाचे संबंध आहेत. म्हणून तर आम्ही सरकार आणू शकलो ना. काल शरद पवार माझ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. पंतप्रधान तुमचेच आहेत ना?’
 
‘चंद्रकांत पाटील यांना मी एक सल्ला देतो, तुमची मती भ्रष्ट झालीये माहित आहे. पण एवढी मती भ्रष्ट झाली असेल तर राज्याच्या जनतेला तुमच्या एकदंरी मानसिक अवस्थेविषयी शंका आहे,’ अशी टीका राऊतांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलपेक्षा 3 पट महाग विकल्या जात आहे लिंबू, कारण जाणून घ्या