Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पार्टनरशी हे 5 खोटे बोला जर तुम्हाला तुमचं नातं घट्ट करायचं असेल

पार्टनरशी हे 5 खोटे बोला जर तुम्हाला तुमचं नातं घट्ट करायचं असेल
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (21:31 IST)
Relationship Tips : आपल्या मोठ्यांनी आपल्याला नेहमी शिकवले आहे की आपण कधीही कोणाशी खोटे बोलू नये. विशेषत: जेव्हा तुमच्या जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक असले पाहिजे कारण तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवायचे आहे. अशा स्थितीत तुम्ही खोट्याचा आधार घेऊन काही वर्षे घालवू शकता, पण तुमचे संपूर्ण आयुष्य नाही, परंतु खूप वेळा असे दिसून आले आहे की जास्त सत्य बोलल्याने देखील लोकांचे नाते बिघडते. त्यामुळे अधूनमधून खोट्याचा अवलंब केला तर त्यात काही नुकसान नाही. मात्र आपली चूक लपवण्यासाठी हे खोटे बोलू नये, हे लक्षात ठेवा.
 
खरं तर, आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत कारण असे अनेक खोटे आहेत ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. अनेक वेळा तुमचे खोटे तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखावण्यापासून वाचवते. हे खोटे कसे असावेत हे देखील जाणून घ्या-
 
भेटवस्तूंचे नेहमी कौतुक करा
तुमच्या जोडीदाराने तुम्हाला एखादी भेटवस्तू दिली असेल तर त्याची प्रशंसा करा. तथापि हे शक्य आहे की तुम्हाला ती भेट अजिबात आवडली नसावी. पण तरीही समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा आणि तिची प्रशंसा करा आणि म्हणा की ही तुमच्या आयुष्यातील सर्वात गोड भेट आहे. कालांतराने समोरच्या आपली आवड-निवड कळेल आणि आवडती वस्तू देखील गिफ्ट म्हणून मिळू शकेल.
 
मनोबल वाढवणे
तू सर्वकाही व्यवस्थित हाताळतोस. केवळ ही ओळ तुमच्या जोडीदाराचे मनोबल वाढवू शकते. कोणत्याही परिस्थितीत एक व्यक्ती घर तसेच कार्यालयाच्या जबाबदाऱ्या हाताळते. अनेक वेळा जास्त कामामुळे ते आपले सर्वोत्तम देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत जरा स्तुती केली तर समोरच्याला बरे वाटेल.
 
जेवण्याचे कौतुक करा
जर तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी प्रेमाने काही तयार केले असेल तर त्याच्या/तिच्या प्रयत्नांकडे लक्ष द्या. पदार्थात काहीतरी उणीव असू शकते. पण जर तुम्ही त्या कमतरतेकडे दुर्लक्ष करून जेवणाची स्तुती केली तर तुमच्या जोडीदाराला ते आवडेल.
 
देखाव्याची प्रशंसा करा
जर तुमच्या जोडीदाराने नवीन लूक स्वीकारला असेल आणि तुम्हाला ते आवडत नसले तरी त्याची चेष्टा करू नका. त्यावेळी फक्त त्यांची स्तुती करा. नंतर नंतर हळू हळू का होईना, प्रेमाने तुमचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडा.
 
आय मिस यू नक्की म्हणा
असे अजिबात शक्य नाही की तुम्ही तुमच्या जोडीदाराला सतत मिस करता. पण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळोवेळी मला तुझी आठवण येते असे म्हणाल, तर त्यांना तुमचे प्रेम जाणवेल. असे केल्याने अनेक वेळा मोठे वादही मिटतात.
 
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Valmiki Jayanti 2024: कोण होते महर्षी वाल्मिकी, सम्पूर्ण माहिती जाणून घ्या