Dharma Sangrah
✕

सुखी वैवाहिक जीवनासाठी भावी पतीला विचारावे हे 6 प्रश्न

Webdunia
रविवार, 5 मे 2024 (11:03 IST)
लग्न हे आयुष्यभराचे नाते आहे.लग्नाचा निर्णय हा मुलगा आणि मुलगी तसेच संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळेच या निर्णयात पालकांव्यतिरिक्त नातेवाईकही सहभागी होतात. भावी पती-पत्नी, जे भविष्याबद्दल जागरूक असतात आणि नंतर उद्भवू शकणाऱ्या समस्यांवर आधीच चर्चा करू इच्छितात.भावी आयुष्याच्या जोडीदाराला हे 6 प्रश्न विचारा जेणे करून भावी वैवाहिक जीवन सुखी होईल.
 
करिअरबद्दल बोला 
लग्नानंतर अभ्यास करण्याचा आहे, नौकरी करायची आहे, की घरी राहायचे आहे. या विषयावर मोकळेपणाने बोला. त्यांना तुमचा अभ्यास आणि करिअर किती महत्त्वाचे आहे हे जाणून घ्या.
 
आर्थिक सुरक्षे बद्दल बोला 
लग्नानन्तर गुंतवणूक आणि घरगुती खर्चाबद्दल बोला. लग्नानन्तर वाद आर्थिक गोष्टींवरूनच होतात. या सर्व गोष्टी आधीच स्पष्ट कराव्या. 
 
 जबाबदाऱ्या जाणून घ्या 
मुलावर जबाबदाऱ्या निश्चित असू शकतात, कुटुंबाप्रती तुमच्यावर काही जबाबदाऱ्या नसतील किंवा तुम्ही एकुलते एक मूल असाल, अशा वेळी तुमचे चारित्र्य मुलासारखे असेल. लग्नानंतर तुम्ही तुमच्या आई-वडिलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडाल? ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तुमचा भावी पती तुम्हाला मदत करेल की नाही हे नक्की जाणून घ्या.
 
तुमचे व्यक्तिमत्त्व 
लग्नानन्तर तुमच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या येणार आहे. तुम्ही एकत्र कुटुंबात राहू शकता का? जबाबदाऱ्या घेऊ शकाल का  असे काही प्रश्न तुमच्या मनात येतात.. अशा परिस्थितीत भावी पतीच्या कुटुंबाला जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःची भूमिकासाठी स्वतःला तयार ठेवा.  
 
कुटुंबातील चालीरीती जाणून घ्या 
प्रत्येक कुटुंबाच्या चालीरीती आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. अशा परिस्थितीत भौगोलिक अंतर हा फरक वाढवू शकतो. लग्न कोणत्या रितीरिवाजांनुसार होणार आहे ते तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यानुसार लग्नाच्या आधी आणि नंतरची तयारी करू शकता, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
 
जोडीदाराची आवड निवड 
जोडीदाराला भावी पत्नीशी काय अपेक्षा आहे. तिला किंवा त्याला फावल्या वेळात काय आवडते. त्याच्या किंवा तिच्या आवडी निवडी काय आहे. हे जाणून घ्या. असं केल्याने आपण स्वतःला नवीन घरासाठी तयार करू शकाल आणि भावी जोडीदाराला देखील समझू शकाल.
 
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नवीन

चिवडा खमंग होण्यासाठी पोहे कसे भाजावेत? तेलकट न होणाऱ्या चिवड्याची कृती

कारले खाताना करू नका या चुका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

बारावीनंतर किंवा पदवीनंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करा; कोर्सेस आणि नोकरीच्या संधी जाणून घ्या

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

पुढील लेख
Show comments