Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नाची तयारी करत आहात ? आधी पार्टनरला हे 5 प्रश्न नक्की विचारा

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2024 (21:10 IST)
लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. हा एक असा निर्णय आहे जो घाईने घेतला तर तुमचे जीवन नरक बनू शकते. योग्य जोडीदार निवडला तर लग्नानंतर आयुष्य आणखी सुंदर बनते. जर तुम्ही योग्य जोडीदार निवडला असेल तर तुम्ही आयुष्यातील चांगल्या-वाईट काळावर सहज मात करू शकता. त्यामुळे लग्नाआधी काही गोष्टी क्लिअर करणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी-
 
आपल्या देशात जिथे बहुतेक विवाह कुटुंबातील लोकांद्वारे जुळवले जातात, तिथे लग्नाच्या निर्णयांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा खूप हस्तक्षेप असतो. काही ठिकाणी ही ढवळाढवळ अती प्रमाणात पोहोचल्याचेही दिसून येते. ही समस्या स्त्रियांबाबद अधिक वेळा दिसून येते. त्यामुळे लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारले पाहिजे की हा निर्णय तुमच्या इच्छेनुसार घेतला जात आहे की नाही.
 
लग्नानंतर तुम्हा दोघांच्या भविष्याचा थेट परिणाम एकमेकांवर होणार आहे. त्यामुळे लग्नाआधी एकमेकांना त्यांच्या भविष्यातील करिअर प्लॅन्सबद्दल नक्कीच विचारले पाहिजे. त्याच वेळी जर तुमच्या दोघांचे करिअर प्लॅन्स एकमेकांशी टक्कर देत असतील, तर तुम्हाला तुमचे प्लॅन बदलणे किंवा पार्टनर बदलणे आवश्यक आहे. ही निवड आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे यावर अवलंबून आहे.
 
लग्नाआधी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कुटुंब नियोजनावर चर्चा केली पाहिजे. आज बरेचदा असे दिसून येत आहे की लग्नानंतर दोघांचे वेगळे मत कुटुंब नियोजनाबाबत समोर येते ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.
 
आजच्या बदलत्या युगात एकमेकांच्या आवडीनिवडीसोबतच एकमेकांच्या आर्थिक परिस्थितीचीही जाणीव ठेवायला हवी. जर तुम्हाला सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार आर्थिकदृष्ट्याही मजबूत असणे आवश्यक आहे.
 
तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडीबद्दल माहिती असायला हवी. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या जोडीदाराला काय खायला आवडते? तो शाकाहारी आहे की मांसाहारी? याशिवाय त्याला कुठे प्रवास करायला आवडते इ. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या आवडी-निवडी सहज समजून घेऊ शकाल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

अप्रतिम चविष्ट कढी ढोकळा रेसिपी

तुम्हालाही आहे का किडनी स्टोनची समस्या चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

Career in PGDM Business Analytics : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन बिझनेस अॅनालिटिक्स

एलोवेरा जेलमध्ये कधीही मिसळू नये या 3 गोष्टी, त्वचेसाठी फायद्याऐवजी नुकसानदायक

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

पुढील लेख
Show comments