Marathi Biodata Maker

मराठी नाती आणि त्यांची नावे

Webdunia
शुक्रवार, 2 मे 2025 (12:22 IST)
मराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत.
 
आई
वडील
मुलगा
मुलगी
नातू - मुलाचा मुलगा, मुलीचा मुलगा
नात - मुलाची मुलगी, मुलीची मुलगी
पती किंवा नवरा
पत्नी किंवा बायको
सवत - नवऱ्याची दुसरी बायको (जर सवत व्यक्तीच्या नात्याने कुठली व्यक्ती असेल तर त्या नावाआधी सावत्र हे विशेषण जोडतात. उदा.: सवत असलेला भाऊ = सावत्र भाऊ)
आजोबा - वडिलांचे वडील
आजी - वडिलांची आई, आईची आई
आजोबा किंवा नाना - आईचे वडील
चुलत आजोबा - आजोबांचे भाऊ
चुलत आजी - आजोबांच्या भावाची बायको
मामे आजोबा - आई/ वडिलांचे मामा
मामी आजी - आई/ वडिलांची मामी
मावस आजोबा - आई/ वडिलांच्या मावशीचा पती
मावस आजी - आई/ वडिलांची मावशी
आत्येकाका आजोबा - आई/ वडिलांच्या आत्याचा पती
आत्या आजी - आई/ वडिलांची आत्या
बहीण
मेव्हणा -बहिणीचा नवरा
भाचा - बहिणीचा मुलगा
भाची - बहिणीची मुलगी
भाऊ
वहिनी - भावाची बायको
पुतणा / भाचा - भावाचा मुलगा
पुतणी / भाची - भावाची मुलगी
काका - वडिलांचे भाऊ
काकू - काकांची बायको
चुलत भाऊ - काकांचा मुलगा
चुलत बहीण - काकांची मुलगी
आत्या - वडिलांची बहीण
मामा / आतोबा - आत्याचा नवरा
आत्येबहीण - आत्याची मुलगी
आत्येभाऊ - आत्याचा मुलगा
मामा - आईचा भाऊ
मामी - मामाची बायको
मामे बहीण - मामाची मुलगी
मामे भाऊ - मामाचा मुलगा
मावशी - आईची बहीण
काका / मावसा - मावशीचा नवरा
मावस बहीण - मावशीची मुलगी
मावस भाऊ - मावशीचा मुलगा
सासू - पती/पत्नीची आई
सासरा - पती/पत्नीचे वडील
दीर - नवऱ्याचा भाऊ
नणंद - नवऱ्याची बहीण
मेव्हणा - बायकोचा भाऊ
मेव्हणी - बायकोची बहीण
सून - मुलाची बायको
जावई - मुलीचा नवरा
नातसून - नातवाची बायको
नातजावई - नातीचा नवरा
व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
विहीण - सुनेची/जावयाची आई
साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
जाऊ -मोठ्या दिराची बायको
भावजय - (बहिणीसाठी) भावाची बायको

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

प्रियांका चोप्राच्या आईने त्यांच्या दाट केसांचे गुपित सांगितले असून, हा घरगुती उपाय व्हायरल

एक असं सासर जिथे सासऱ्यांमध्ये भेटले हक्काचे बाबा

दररोज फक्त ४ ते ६ बदाम खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे; संशोधनातून मोठा खुलासा!

फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी

रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल

पुढील लेख
Show comments