Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mavshi Birthday Wishes Marathi मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
, शनिवार, 24 मे 2025 (13:41 IST)
आई तर आईच असते पण 
मावशी म्हणजे आईचं दुसरं रूपच असते
अशा माझ्या प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कुठल्याही परिस्थितीत नेहमी पाठीशी उभी असते.
अवगुणांवर पांघरुण घालून
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मावशी भांची हे नाते मैत्रिणीचे असते
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आजचा दिवस खूप खास आहे
कारण माझ्या लाडक्या मावशीचा वाढदिवस आहे आज
तुझ्यासारखी खास व्यक्ती 
आमच्या आयुष्यात येते
आणि आमचे आयुष्य खास बनविते
मावशी तुला या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
 
मला स्वतःचं मुलं समजून
आई समान प्रेम दिले
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
कधी सल्लागार तर कधी मजेशीर मैत्रीण असते
आनंदाचे क्षण असो वा दुःखाचे प्रसंग प्रत्येक
वेळी सोबत माझ्या माझी लाडकी मावशी असते
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मावशी
मावशी व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
 
कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या
प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत डब्बे भरून खाऊ घेऊन येणाऱ्या
माझ्या लाडक्या प्रेमळ मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्‍यावर नेहमी असावा
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
 
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी 
कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे मावशी
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत
नाही म्हणून त्याने आई निर्माण केली
आणि आईला समर्थ पर्याय कोणी होऊ शकेल
तर ती अशी एकच म्हणजे मावशी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी.
ALSO READ: Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
आईच्या मारा पासून वाचवणारी
संकटात मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
माझी लाडकी मावशी
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या
मदतीला धावून येते
खरंच माझी मावशी माझ्यावर
खूप जीव लावते
मावशी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
ALSO READ: Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
साखरेसारख्या गोड मावशीला 
मुंग्या लागे पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वृषभ राशीवरून मुलांसाठी यूनिक नावे अर्थासहित