Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Miss You Father's Day Messages in Marathi वडिलांच्या आठवणीत संदेश

बाबा, तुम्ही जरी आज आमच्यात नसलात, 
तरी तुमचा प्रत्येक शब्द, 
तुमचा तो प्रेमळ स्पर्श 
आणि तुमचा आधार 
नेहमी आमच्या पाठीशी आहे
तुमची खूप आठवण येतेय बाबा! 
 
या गर्दीच्या जगात प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगता येतो, 
पण हक्काने आणि प्रेमाने 'बेटा' म्हणणारे बाबा 
आता कधीच परत येणार नाहीत. मिस यू बाबा.
 
बाबा, तुम्ही गेल्यानंतर समजलं की 
घराचा पाया आणि आमचं छप्पर काय होतं
तुमच्याशिवाय हे घर आणि आमचं आयुष्य 
दोन्ही अगदी सुने-सुने झाले आहेत.
 
तुमच्या कष्टाची आणि घामाची किंमत 
आज पावलोपावली जाणवतेय
तुम्ही दिलेली शिकवण घेऊन पुढे जात आहे, 
पण प्रत्येक वळणावर तुमची कमी भासतेय, बाबा.
 
लोकांसाठी हे वर्ष बदललं असेल, 
पण माझ्यासाठी तुमच्याशिवाय जाणारा प्रत्येक दिवस 
आजही तितकाच जड आणि कठीण आहे
खूप आठवण येतेय तुमची.
 
हक्काने रागवणारे आणि पाठीवरून मायेचा हात फिरवणारे बाबा देवाघरी गेले... 
आज मनात कितीही दुःख असलं, तरी ते ऐकून घेणारे तुम्ही सोबत नाही आहात.
 
बाबा, तुमची सावली दूर झाली आणि डोक्यावरचं आभाळच हरवलं
तुमच्यासारखा निस्वार्थी माणूस आणि खंबीर आधार आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाही
 
कधी कधी असं वाटतं की तुम्ही कुठेतरी बाहेर गेलाय 
आणि आता हाक मारत घरात याल... 
पण हे सत्य स्वीकारणं आजही खूप कठीण जातंय
आय मिस यू, पापा.
 
तुम्ही असताना कधीच कोणत्या गोष्टीची भीती वाटली नाही, 
कारण माहीत होतं की मागे माझे बाबा उभे आहेत. 
आज स्वतःला खूप एकटं वाटतंय.
 
तुमचा चेहरा, तुमचं ते हसणं आजही डोळ्यांसमोर जश्याच्या तसं आहे
तुम्ही शरीराने दूर गेलात, तरी माझ्या हृदयात नेहमी जिवंत राहाल, बाबा.
 
जगातील सगळी सुखे एका बाजूला 
आणि बाबा तुमच्या कुशीत मिळणारा तो शांत प्रहर एका बाजूला
तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मिस यू सो मच, पापा.
 
देवाकडे एकच प्रार्थना आहे, 
तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखात राहा
तुमच्या या मुलाला/मुलीला तुमचा नेहमी 
अभिमान वाटेल असंच मी वागेन 
खूप आठवण येतेय तुमची!
 
बाबा, तुम्ही आज माझ्यासोबत नसलात तरी 
तुमची आठवण प्रत्येक क्षणी माझ्यासोबत असते. 
खूप आठवण येते तुमची!
 
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार हरवला आहे, बाबा! 
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 
Miss You.
 
तुमच्याशिवाय हे जीवन खूप अपूर्ण वाटते. 
बाबा, तुम्ही खूप दूर निघून गेलात, 
पण माझ्या हृदयात तुम्ही नेहमी जिवंत असाल.
 
बाबा, तुमच्या शब्दांमधील माया आणि शिस्त 
मला आजही मार्गदर्शन करते. 
तुम्ही मला सोडून गेलात तरी 
तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Fathers Day Special बाबांसाठी काही मिनिटांत हे ४ स्वादिष्ट पदार्थ बनवा