Parenting Tips Teach Moral Values Of Diwali: यावर्षी दीपोत्सव 10 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पाच दिवसांच्या सणाच्या पहिल्या दिवशी वसू वारस ,धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी आणि त्यानंतर 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीनंतर पाडवा, भाऊबीज हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार दिवाळी हा एक असा सण आहे जो घरातीलच नाही तर मनातील अंधार दूर करतो. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
अयोध्येचा राजा श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षांचा वनवास संपवून आपल्या राज्यात परतले. त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्येतील जनतेने दिवे लावून संपूर्ण राज्य उजळून टाकले. अंधारात प्रकाश टाकला होता. दिवाळीचा सण दिव्यांचा सण म्हणून साजरा करतात. गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. फटाके फोडतात . विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात.या दिवाळीत तुमच्या मुलांना शिष्टाचाराशी संबंधित चांगल्या सवयी शिकवा जेणे करून त्यांच्यावर चांगले संस्कार लागतील.
आचरण
या दिवाळीत मुलांना चांगले वागणे शिकवू शकते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम बद्दल सांगा आणि मुलाला त्याचे आचरण अंगीकारण्यासाठी प्रेरित करा. मोठ्यांशी कसे वागावे हे मुलांना शिकवा. वडिलधाऱ्यांना आणि लहानांना प्रेम दाखवण्याचे मार्ग समजावून सांगा.
स्वच्छतेचे महत्त्व-
मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिवाळी हा योग्य काळ आहे . दिवाळीत घराची साफसफाई करताना मुलांची मदत घ्या. त्यांना सांगा की घरामध्ये आणि आजूबाजूची स्वच्छता आरोग्यासाठी चांगली आहे आणि तुम्हाला चांगले आयुष्य देखील देते. त्याला धार्मिक महत्त्वही आहे. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात.
दान देणे शिकवा-
दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करताना तुम्ही घरातील अनेक जुन्या वस्तू आणि कपडे फेकून देता. ज्या वस्तू आता तुम्हाला उपयोगी नाहीत किंवा जुन्या आहेत, त्या तुम्ही गरजू व्यक्तीला देऊ शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला जुन्या वस्तू मुलांसाठी सुपूर्द करा. त्यांना इतरांना मदत करण्यास आणि दान करण्यास शिकवा.
कुटुंबाचे महत्व -
मुलांना रामायणाची कथा सांगावी. श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्यात किती प्रेम होते ते त्यांना सांगा. चारही भाऊ एकमेकांसाठी राजेशाही कर्तव्ये आणि ऐश्वर्य सोडण्यास तयार होते. कुटुंबात अशीच एकता आणि प्रेम असायला हवे. मुलाला कुटुंबाशी जोडलेले राहण्यास आणि भावंडांची काळजी घेण्यास शिकवा.