Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Parenting Tips :मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टी नाविन्यपूर्ण बनवण्यासाठी पालकांनी या 5 तंत्राचा अवलंब करा

Parenting Tips :मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टी नाविन्यपूर्ण बनवण्यासाठी पालकांनी या 5 तंत्राचा अवलंब करा
, शुक्रवार, 3 जून 2022 (22:21 IST)
Parenting Tips :आजच्या काळात, उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना व्यस्त आणि सक्रिय ठेवणे खूप आव्हानात्मक बनले आहे. पूर्वी उन्हाळ्यात मुलं त्यांच्या मित्रांसोबत बाहेरच्या कामात गुंतायची,आजी-आजोबांना भेटायची आणि गृहपाठावर लक्ष केंद्रित करायची. पण आता या सगळ्या गोष्टींपासून मुलांची आवड दूर झाली आहे. कारण आहे मोबाईल. आणि हे व्यसन त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींपासून आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या क्रियाकलापांपासून दूर नेत आहे.पालकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक टिप्स आहे.ज्यांना अवलंबवून मुलांची उन्हाळी सुट्टी खास बनवू शकता. 
 
1 मुलांना दर्जेदार वेळ द्या-
 तुम्ही 10 तासांची नोकरी, रात्रीची शिफ्ट किंवा टूरिंग जॉब असो, लक्षात ठेवा तुमच्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवणे मुलांच्या मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना तुमच्या लहानपणापासूनच्या गोष्टी सांगण्यासाठी वेळ काढा किंवा त्यांना कला आणि हस्तकला यासारख्या क्रियाकलापांमध्ये सामील करा. याशिवाय, चालणे, धावणे किंवा टग ऑफ वॉर यासारख्या क्रियाकलापांमध्ये मुलांना जोडून तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकता.असे केल्याने तुमचे कौटुंबिक बंध दृढ होतील आणि मुलांमध्ये सर्जनशील कौशल्येही विकसित होतील.
 
2 पालक मुलांसोबत नवीन कौशल्ये विकसित करा - 
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक प्रकारचे उन्हाळी वर्ग आयोजित केले जातात. ज्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांना कमी वेळात एकाच ठिकाणी अनेक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळू शकते. जसे की नृत्य, रेखाचित्र, रंग,अबॅकस, हॅन्ड रेटिंग सुधारणे, कला आणि हस्तकला आणि पोहणे इ. खरे तर मुलां सोबत त्यांचे पालकही अशा उपक्रमात सहभागी झाले तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. तेव्हा असे समजू नका की अशा कामांमध्ये गुंतण्याचे आता तुमचे वय नाही, तर तुम्ही अशा लोकांसाठी एक आदर्श ठेवू शकता जे प्रत्येक गोष्टीत वयाचा अडथळा आणतात.
 
3 मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित करा - 
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांवर शालेय उपक्रम किंवा शाळेचा गृहपाठ पूर्ण करण्याचे कोणतेही दडपण नसते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी प्रवृत्त करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही स्वतः कथा वाचू शकता आणि कथन करू शकता किंवा तुम्ही त्यांना वाचायला आणि कथन करायला सांगू शकता. असे केल्याने, त्यांना नवीन संकल्पना आणि कल्पना समोर येतील आणि त्यांच्या समोर दृश्य पात्रे तयार होऊ लागतील आणि हे त्यांची सर्जनशीलता वाढविण्यात उपयुक्त ठरेल.
 
4 मुलांना स्क्रॅपबुक किंवा डायरी द्या -
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना जास्तीत जास्त उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यावर भर द्या, जेणेकरून त्यांना गॅजेट्सची गरज भासणार नाही. आणि यासाठी तुम्ही स्क्रॅपबुक किंवा डायरीची मदत घेऊ शकता. स्क्रॅपबुक बनवण्यासाठी त्यांच्यासोबत बसा आणि त्यात त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील सहलींमधील फोटोंसह इतर संस्मरणीय वस्तू जोडा. याशिवाय, तुम्ही त्यांना डायरी लिहिण्यास प्रवृत्त करू शकता, ज्यामुळे त्यांना त्यांचे विचार अधिक चांगल्या प्रकारे मांडण्यास मदत होईल.
 
5 जबाबदारीची सवय विकसित करा- 
मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदाही घेऊ शकता. उदाहरणार्थ, मुलाला त्याची खोली स्वच्छ करण्यास सांगा किंवा त्याला सायकल-खेळणी सारख्या त्याच्या आवडत्या गोष्टी स्वच्छ करण्यास सांगा किंवा नेहमी योग्य ठिकाणी ठेवा. जर लहान मूल घरात घाण पसरवत असेल तर त्याला रागावू नका, तर हे आपले घर आहे, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. लहानपणीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून दिली तर तो भविष्यात निष्काळजी होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Tips :Contact Lenses:लेन्स न काढता झोपणे धोकादायक ठरू शकते,जाणून घ्या