Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
, मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (22:10 IST)
Cool Down Tips:  पती-पत्नीचे नाते हे मित्रासारखे असते. खूप प्रेम, समजून आणि काळजी घेऊन दोघेही आयुष्यात पुढे जातात. पण कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून किंवा गैरसमजातून दोघांमध्ये भांडण होते, स्त्रिया खूप भावूक असतात, त्यांना छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल खूप लवकर वाईट वाटते आणि मग त्या पतीवर रागावतात. पत्नीचा राग घालविण्यासाठी काही हेल्थी रिलेशन टिप्स सांगत आहोत,ज्यांचा अवलंब केल्याने पत्नीचा राग शांत होऊ शकतो. चला तर मग या टिप्स जाणून घेऊ या.
 
1. जेव्हा पत्नीला एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्यावर खूप राग येतो, तेव्हा तिच्यासाठी जे काही करता येईल ते करा. जसे की तुम्ही त्यांना सॉरी बोलून त्यांना मनवू शकता किंवा त्यांच्यासाठी भेटवस्तू आणू शकता. 
 
 2. दुसरी गोष्ट जी तुम्ही सर्वात जास्त लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवावे कारण बरेचदा असे घडते की तुम्ही रागाच्या भरात असे काही बोलता की तुम्हाला नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले असेल तर बायको तुमच्यावर रागावते, या साठी तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
 
3. तुमचे कधीही भांडण झाले असेल, परंतु रात्रीच्या वेळी तुमचा राग शांत करा. तुमच्या बायकोला पटवून द्या म्हणजे तुम्ही टेन्शनशिवाय रात्री झोपू शकता, नाहीतर तुम्ही दोघेही रात्रभर एकाच गोष्टीचा विचार करत राहाल.
 
4. पत्नीला पटवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सकाळी पत्नीच्या आधी उठून तिला बेड टी सर्व्ह करणे. महिलांना सरप्राईज आवडतात. यामुळे तिचा मूड सुधारेल आणि ती राग विसरेल. शिवाय वेळ मिळाल्यास सकाळचा नाश्ता तुम्ही स्वतः बनवू शकता.
 
5. पत्नीचा मूड सुधारण्यासाठी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर बायकोला चित्रपट दाखवायला घेऊन जा आणि रात्री एकत्र जेवण करा. यामुळे तुमच्यातील भांडण संपेल.
 
6. पत्नीला काही नवीन भेटवस्तू द्या, तुम्ही महिलांना फुले किंवा कोणतीही आवडती वस्तू भेट देऊ शकता. ही गोष्ट बायकोला खूप आवडते.
 
7. लाख प्रयत्न करूनही बायकोचा राग शांत होत नसेल तर त्यांना लव्हनोट लिहून पटवून द्या.
 
या सर्व टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या पत्नीचा राग शांत करू शकता. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in Graphic Designing: ग्राफिक डिझायनिंग मध्ये करिअरची संधी, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घ्या