Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज ठाकरे यांचा पुन्हा परप्रांतियांनवर हल्ला : संताप मोर्चा

राज ठाकरे यांचा पुन्हा परप्रांतियांनवर हल्ला : संताप मोर्चा
, शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (15:53 IST)
विधानसभा आणि महापालिका निवडणुका यामध्ये मनसेचा पराभव झाला होता. यांमुळे मनसेत मरगळ आली होती. मात्र याच वर्षी मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 39 जण जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार अनधिकृत फेरीवाले आणि विक्रेत यांच्या मुळे झाले असे उघड झाले आणि राज ठाकरे यांनी हा मुद्दा लगेच उचलला आणि फेरीवाला व परप्रांतीय विरोधात संताप मोर्चाचे आंदोलन सुरु झाले. याचा परिणाम म्हणून मनसेने रेल्वेला १५ दिवस मुभा दिली होती. मात्र कोणताही परिणाम झाला नाही. मग राज ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे मनसैनिकांनी पुलाजवळील सर्व फेरीवाले मारण्यास सुरवात केली. यामुळे अनेक स्टेशन बाहेर होणारी गर्दी साठी मार्ग मोकळा झाला आणि फेरीवाले या भागातून सध्या तरी गायब झाले आहेत.
 
ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा फेरीवाल्यांवर वळवला आहे. ठाण्यातील खोपट आणि इतर परिसरात मासळी विकणाऱ्या विक्रेत्यांना आज मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मच्छी विकण्याचा व्यवसाय कोळी बांधवांचा आहे. परंतु त्यांना व्यवसाय न करू देता घरोघरी जाऊन मच्छीविक्री करणाऱ्या परप्रांतीयांना मनसेने आंदोलन केले.याच प्रकारची आंदोलने दादर, सी एस टी, अंधेरी आणि डोंबिवली इतर स्टेशनवर करण्यात आली आहेत त्यामुळे रेल्वे पूल मोकळे झाले आहेत.
 
राज ठाकरे फेसबुकवर
राज्याच्या राजकारणात राज ठाकरे मोठे नाव आहे. त्यांच्या मागे तरुणवर्ग असतो त्यामुळे त्यांचे अनेक सभेला अनेक नागरिक उपस्थित राहतात. तर अनेक दिवसांपासून ते सोशल मिडीयावर नाहीत अशी ओरड पक्षातून होत होती. ती मागणी पाहता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे फेसबुक पेज तयार झाले आणि नंतर एका सोहळ्यात राज ठाकरे यांचे अधिकृत पेज प्रसिद्ध झाले. तर काही तासात या पेज ने लाखोंचा आकडा पार केला होता. या पेजवर राज ठाकरे आपली मते आणि व्यंगचित्र प्रसिद्ध करत असतात.तर अनेकदा व्हिडियोच्या माध्यमातून मनसेच्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधत असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारची सर्वात मोठी घोषणा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना