Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2018 मध्ये हे 9 मोबाइल अॅप्स राहिले ट्रेडिंगमध्ये

Webdunia
अँड्रॉइड फोनसाठी गुगल प्ले स्टोअरवर प्रत्येक वर्षी अनेक अॅप्स प्रकाशित केल्या जातात. यापैकी काही अॅप्सकडे लोक बघत देखील नाही, त्याचवेळी बरेच अॅप्स असे आहे जे लाँच झाल्याबरोबर व्हायरल होतात. वर्ष 2018 आता संपत आहे, तर चला 2018 दरम्यान लोकप्रिय झालेले अँड्रॉइड अॅप्स कोणते राहिले जाणून घ्या: 
 
1. टिक-टॉक  - टिक-टॉक नाव तर आपण ऐकले असेल. नुकतेच, टिक-टॉकने Musical.ly सह भागीदारी केली आहे. या सोशल मीडिया अॅपच्या मदतीने, लोक लहान-लहान छान विनोदी व्हिडिओ बनवत आहे. हा अॅप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी आहे.
 
2. गुगल पे (तेज) - आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी गुगलचा डिजीटल पेमेंट अॅप गुगल पे नक्कीच वापरला असेल. काही महिन्यांपूर्वीच याचे नाव बदलले आहे. पूर्वी याचे नाव गुगल तेज अॅप असे ठेवले गेले होते. सुरवातीला या अॅपसह कॅशबॅक ऑफर देखील देण्यात आला. हा अॅप युनिफाइड पेमेंट इंटिग्रेशन (यूपीआय) चं समर्थन करतं.
 
3. व्हाट्सअॅप बिझनेस - व्हाट्सअॅपने अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही फोनसाठी आपला बिझनेस अॅप लाँच केला होता ज्याद्वारे लोक त्यांचे व्यवसाय करू शकतात आणि एका सत्यापित खात्याद्वारे ग्राहकांशी संवाद करू शकतात.
 
4. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओज - जर आपण वेब सीरिज मिर्जापूर बघितली असेल तर आपल्याला अमेझॉन प्राइम व्हिडिओबद्दल नक्कीच माहीत असेल. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर देखील एक्सक्लूसिव्ह व्हिडिओ सामग्री दर्शविली जात आहे, तथापि बऱ्याच संस्थांनी या व्हिडिओंवर आपत्ती व्यक्त केली आहे की त्यात अश्लीलता आहे. ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर आपण हिंदी, इंग्रजी समेत अनेक भाषांमध्ये व्हिडिओ पाहू शकता. 
 
5. जिओ टीव्ही - संपूर्ण वर्षभर, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीमध्ये स्पर्धा राहिली. परिस्थिती अशी राहिली आहे की गुगल प्ले-स्टोअरवर ट्रेडिंग अॅप्सच्या यादीत हे दोन अॅप्स बऱ्याच वेळा पाहिले गेले. जिओ टीव्हीवर जिओ फ्रीमध्ये व्हिडिओ आणि चित्रपट पाहण्याची संधी देतो, तथापि त्यासाठी जिओचा सिमकार्ड असणे गरजेचे आहे.
 
6. गुगल फाइल्स गो - गुगलने अँड्रॉइड स्मार्टफोनची जंक फाइल काढून टाकण्यासाठी आणि फाइल्स शेअर करण्यासाठी हे अॅप लाँच केले होते. लोकांना हे अॅप खूप आवडले. या अॅपची स्पर्धा शेअर इट अॅप बरोबर राहिली.
 
7. ड्युअल स्पेस - स्मार्टफोनमध्ये एकत्रितपणे दोन फेसबुक, व्हाट्सअॅपसारख्या अॅप्स चालविण्यासाठी लोक ड्युअल स्पेस अॅप वापरतात. तसे, 2017 मध्ये, पॅरलल स्पेस नावावरून एक अॅप लाँच करण्यात आला होता जे खूप लोकप्रिय झाले होते. 
 
8. यूट्यूब गो - गुगलने कमी रॅम आणि अँड्रॉइड गो स्मार्टफोनसाठी हे अॅप लाँच केले आणि हे यूट्यूबच्या वास्तविक अॅपची लाइट आवृत्ती आहे. या अॅपमध्ये देखील आपण सर्व व्हिडिओ चांगल्या गुणवत्तेत बघू शकता. इंटरनेटची गती कमी असतानाही हे अॅप योग्यरीत्या कार्य करतं.
 
9. जिओ-सावन - जिओ म्युझिक आणि सावन यांची एकत्र येण्याची बातमी बऱ्याच काळापासून सुरू असून नुकतेच जियोसावन अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपद्वारे आपण 45 दशलक्षांपेक्षा अधिक गाणी ऐकू शकता. यावर भोजपुरी, हिंदी, इंग्रजी आणि मराठी सारख्या बऱ्याच भाषेतील गाणीही उपलब्ध असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments