Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले टॉप 5 कपल्स

Top 5 most popular couples in 2019
, सोमवार, 30 डिसेंबर 2019 (15:12 IST)
बॉलिवूडमध्ये दरवर्षी नवी नाती जुळतात आणि तुटतात. पण काही जोड्या आणि काही सेलिब्रेटी मात्र सतत चर्चेत राहतात. किंबहुना चाहते आणि या जोड्यांमध्ये एक वेगळं नातंच तयार होतं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अशा काही जोड्या ज्या संपूर्ण वर्षभर चर्चेत राहिल्या. 
फरहान अख्तर आणि शाबानी दांडेकर
ही जोडी यंदा सोशल मीडिावर फार चर्चेत राहिली. हे दोघंही नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. 
Top 5 most popular couples in 2019
Photo : Instagram
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर
सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील जोडी आहे. या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली असून ते
लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. 
Top 5 most popular couples in 2019
क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
हे दोघे लवकरच लग्न करतील अशा चर्चा आहे. या दोघांनीही मागील वर्षी आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर दोघंही अनेकदा एकमेकांच फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसतात.
Top 5 most popular couples in 2019
कातिर्क आर्यन आणि सारा अली खान 
वर्षाच्या सुरुवातीपासून चर्चेत आलेली जोडी होती ती म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. हे दोघंही 'लव्ह आज कल 2' मध्ये दिसणार आहेत.
Top 5 most popular couples in 2019
अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला
अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही जोडी यंदा चर्चेत राहिली. कारण, गॅब्रिएलासाठी अर्जुननं त्याची पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिला. इतकंच नाही तर गॅब्रिएलानं अर्जुनशी लग्न करण्याआधीच त्याच्या बाळाला जन्म दिल्यानं हे दोघं चर्चेत राहिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्रिमंडळ विस्तार: अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ - LIVE