Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक विद्यार्थी युक्रेनहून परतले, मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थी परतले

More than 200 students from Maharashtra returned from Ukraine
, शुक्रवार, 4 मार्च 2022 (07:32 IST)
महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी गुरुवारी सात विशेष विमानांनी युक्रेनमधून दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या पाच दिवसात १२६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे. युद्धजन्य युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. देशातील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसह या मोहिमेंतर्गत २७ फेब्रुवारी २०२२च्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार दुपारपर्यंत विशेष विमानांनी महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.
 
कधी किती विद्यार्थी आलेत
२७ फेब्रुवारी ५८ विद्यार्थी
२८ फेब्रुवारीला १४ विद्यार्थी
१ मार्च २६ विद्यार्थी
२ मार्च ६४ विद्यार्थी
३ मार्च ८७ विद्यार्थी .
 
राज्यातील महत्वाच्या विमानतळांद्वारे स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत सर्वाधिक ७८ विद्यार्थी मुंबईला परतले आहेत. पुणे येथे २३, नागपूर येथे १२ तर औरंगाबाद येथे ७ विद्यार्थी परतले आहेत. तीन विद्यार्थी नांदेडमार्गे मुंबई गेले तर दोन विद्यार्थी हैद्राबाद व एक विद्यार्थी गोव्याहून महाराष्ट्रात स्वगृही सुखरूप पोहचला आहे.महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia-Ukraine War: काळ्या समुद्रात जहाज बुडाले, भूसुरुंगात आदळल्याने 4 क्रू सदस्य बेपत्ता