Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशिया युक्रेन युद्ध : राजधानी कीव्हवरचे हल्ले सुरूच, युक्रेनला कमकुवत करण्यासाठी रशिया नवीन युद्धनीती वापरणार

Webdunia
मंगळवार, 15 मार्च 2022 (16:01 IST)
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा 20वा दिवस आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवरचे हल्ले सुरूच ठेवलेत.
 
राजधानी कीव्हमध्ये आजही स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर एका 9 मजली रहिवासी इमारतीला आग लागली. ही आग आता विझवण्यात आल्याचं युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी म्हटलंय.
 
तर आणखी एका हल्ल्यामध्ये कीव्हमधल्या एका मेट्रो स्टेशनचंही नुकसान झालंय.
 
कीव्ह मेट्रो नेटवर्कने या स्टेशनचे फोटो ट्वीट केले आहेत.
युक्रेनने दोनेत्स्कवर केलेल्या क्षेपणास्त्रं हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपण युक्रेनच्या संरक्षण उद्योगाला आता लक्ष्य करणार असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय.
 
फुटीरतावाद्यांच्या ताब्यातल्या दोनेत्स्क भागावर युक्रेनने सोमवारी (14 मार्च) क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे.
 
एका ऑनलाईन पोस्टमध्ये रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय, "दोनेत्स्कवर टोकता-यू क्षेपणास्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्याचं उत्तर म्हणून रशियाच्या फौजा हत्यारांचं उत्पादन करणाऱ्या युक्रेनच्या संरक्षण उद्योगाशी संबंधित कंपन्यांना लक्ष्य करतील. या कंपन्यांच्या जागा इथे काम करणाऱ्या आणि परिसरात राहणाऱ्या युक्रेनियन नागरिकांनी सोडाव्यात असं आवाहन आम्ही करतो."
 
दोनेत्स्कमध्ये युक्रेनने केलेल्या हवाई हल्ल्यात 20 नागरिकांचा जीव गेल्याचा आरोपही यापूर्वी रशियाने केला होता.
 
पण युक्रेनने आपण असे हल्ले केले नसल्याचं म्हणत यासाठी रशियन क्षेपणास्त्रं जबाबदार असल्याचं म्हटलंय.
दरम्यान चेर्नोबिल अणुभट्टी प्रकल्पाचा वीज पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचं इंटरनॅशन अटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)ने म्हटलंय.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबच्या या काही महत्त्वाच्या घडामोडी
रशिया आणि युक्रेनमधली बोलणी मंगळवारी 15 मार्चलाही सुरू राहणार असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
रशियाची 4 हेलिकॉप्टर्स पाडल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केलाय. रशियन सैन्याने आपले हल्ले सुरूच ठेवलेत पण त्यांना फार पुढे सरकता आलेलं नाही. महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि निवासी इमारतींवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले करणं रशियाने सुरूच ठेवलंय.
ताब्यात घेतलेल्या भागांमध्ये आरोग्यसेवांचा वापर रशियन सेना जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी करत आहे.
युद्धाचा निषेध करणाऱ्या एका आंदोलक महिलेने रशियाच्या मुख्य टीव्ही चॅनलवर सुरू असलेल्या संध्याकाळच्या बातमीपत्रात व्यत्यय आणला. तिला अटक करण्यात आल्याचं समजतंय.

चीनने रशियाला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने चीनला दिला आहे. यासोबतच युक्रेनला आपण शस्त्रास्त्रं पुरवठा, अन्न आणि आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. युक्रेनमधले निर्वासित अमेरिकेत आले तर त्यांचं आपण स्वागत करू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारशी संबंध असलेल्या 100 व्यक्तींवर नवीन अतिरिक्त निर्बंध लादण्याची तयारी युकेने केली आहे.

तर युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून जपानने आणखी 17 रशियन नागरिकांवर निर्बंध घालण्याची कारवाई केली आहे.

न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या युक्रेनमध्ये जन्म झालेल्या नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या 4000 नातेवाईकांना आसरा देण्याची तयारी न्यूझीलंडने दाखवली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात सरकार बदलणे गरजेचे म्हणत शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई,चकमकीत 11 अतिरेकी ठार

मुंबईत प्लास्टिकच्या पिशवीत तुकड्यात मृतदेह आढळले

राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा भाजपचा आरोप, कारवाई करण्याची मागणी

निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली उद्धव ठाकरेंची बॅग, मोदींची तपासणार का म्हणाले

पुढील लेख
Show comments