24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनवर ताबा मिळवायचा होता आणि म्हणूनच त्यांच्या आदेशावरून रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. या युद्धाला अडीच वर्षे उलटून गेली तरी पुतिन अजूनही युक्रेन ताब्यात घेऊ शकलेले नाहीत.
रशियन सैन्याने युक्रेनच्या काही भागात तळ ठोकून तो आपल्या ताब्यात घेतला आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. तसेच, युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे.
युक्रेनचे सैन्य आपल्या अनेक भागातून रशियन सैन्याला हुसकावून लावत आहेच, शिवाय अनेक रशियन वसाहतींवरही कब्जा केल्याचा दावा करत आहे.
रशियाने आज युक्रेनमधील रुग्णालयावर दुहेरी हल्ला केला आहे. रशियन सैन्याने आज युक्रेनमधील सुमी हॉस्पिटलवर डबल-टॅप ड्रोन हल्ला केला, ज्यामुळे हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले. रशियाच्या या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 11 जण जखमी झाले आहेत.जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.