Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वीर शिवाजींचे तीन प्रेरक किस्से

वीर शिवाजींचे तीन प्रेरक किस्से
* शहाजी हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते. शहाजी अनेकदा युद्धानिमित्ताने घरापासून दूर राहायचे. म्हणून त्यांना लहानपणापासून शिवाजी किती निडर आणि पराक्रमी आहे याची माहिती कमीच होती. एकदा ते शिवाजींना बीजापूर सुलतानाच्या दरबारात घेऊन गेले. शहाजी यांनी तीनदा वाकून सुलतानाला सलाम केले परंतू शिवाजींना असे करायला स्पष्ट नकार दिले आणि आपल्याजागी ताट मान करून उभे राहिले. एका परदेशी शासकासमोर ते कोणत्याही किमतीत वाकायला तयार नव्हते. एवढेच नव्हे तर एखाद्या सिंहाप्रमाणे ते शान पूर्वक दरबारातून बाहेर पडले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना कुशल आणि प्रबुद्ध सम्राट मानले गेले. 
 
* एकदा शिवाजीसमक्ष त्यांचे सैनिकांनी गावाच्या मुखियाला धरून आणले.  मुखिया मोठ्या आणि दाट मिशा असलेला रुबाबदार व्यक्ती होता. परंतू आज त्यावर एक विधवेची अब्रू लुटण्याचा गुन्हा सिद्ध झालेला होता. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा शिवाजींचे वय मात्र 14 वर्ष असे होते. तरी ते बहादूर, निडर आणि न्यायप्रिय होते आणि महिलांसाठी त्यांच्या मनात असीम सन्मान होता. त्यांनी तात्काळ निर्णय केला की या व्यक्तीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून द्या, अश्या भयंकर गुन्ह्यासाठी याहून कमी शिक्षा होऊच शकत नाही.
 
* एकेकाळी पुण्याजवळ नचनी गावात एका चित्त्याच्या दहशतीमुळे लोकं हैराण होते. तो अचानक हल्ला करायला आणि जंगलात गायब होऊन जायचा. गावकरी आपली समस्या घेऊन शिवाजींकडे पोहचले आणि भयानक चित्त्यापासून बचावाची विनंती करू लागले. महाराज, चित्ता किती तरी मुलांवर वार करून चुकला आहे तसेच आम्ही झोपी गेलो तो घात करतो. गावकर्‍यांची समस्या ऐकून महाराज म्हणाले, काळजी नसावी, मी आहे आपल्या मदतीसाठी. 
 
शिवाजी आपल्या सैनिक आणि यसजीसोबत जंगलात शिकार करण्यासाठी निघाले. शोध घेतल्यावर चित्ता समोर आला तर सैनिक भीतीमुळे मागे सरकले मात्र शिवाजी आणि यसजी यांनी निडरपणे त्यावर वार केला आणि त्याला घटकेत मात केले. गावकर्‍यांनी प्रसन्न होऊन जयघोष जय शिवाजी केला... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्रपती शिवाजींबद्दल वैयक्तिय माहिती...