Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Webdunia
Pitru Dosh वैदिक ज्योतिषात पितृ दोष निवारण उपाय सांगण्यात आले आहे. हिंदू धर्मात पितृ दोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृ दोष शांतीसाठी उपाय केले जातात. ज्योतिषाप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत पितृ दोष असेल तर अनेक प्रकाराच्या कष्ट झेलावे लागू शकतात. जसे जीवनात अस्थिरता, संतान कष्ट, नोकरी-व्यवसायात अडथळे, आर्थिक संकट, गृह क्लेश, शारीरिक आणि मानसिक कष्ट झेलावे लागतात. अशात कुंडलीतून पितृ दोष निवारण आवश्यक असतं. पितृ दोष मुक्ती उपाय जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेऊया की पितृ दोष म्हणजे काय? कोणत्या कारणांमुळे कुंडलीत पितृदोष आढळतो?
 
पितृ दोष म्हणजे काय ?
पितरांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात. असे मानले जाते की मृत्यूनंतर, आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल अनादर आणि दुर्लक्ष करतात. यामुळे दुःखी होऊन मृत आत्मा आपल्या वंशजांना शाप देतात, ज्याला पितृदोष म्हणतात. हा एक प्रकारचा अदृश्य दुःख मानला जातो.
 
पितृ दोष कारण
सूर्य, मंगळ आणि शनि व्यक्तीच्या लग्न आणि पाचव्या घरात तसेच गुरु आणि राहू आठव्या घरात असतील तर पितृदोष तयार होतो. याशिवाय आठवा किंवा बारावा स्वामी सूर्य किंवा गुरूशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीला पितृदोष होतो. त्याचबरोबर सूर्य, चंद्र आणि लग्नेश यांचा राहूसोबतचा संबंधही कुंडलीत पितृदोष निर्माण करतो. राहू आणि केतू यांचा जन्म कुंडलीत पाचव्या घराशी किंवा भावेशशी असेल तर पितृ दोष तयार होतो. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांचा स्वतःच्या हातांनी खून केला, त्यांना दुखावले किंवा मोठ्यांचा अनादर केला तर त्याला पुढील जन्मात पितृदोष भोगावा लागतो. मात्र पितृदोषावर उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अशुभ प्रभाव दूर होतो.
 
पितृ दोष लक्षण
गर्भधारणेत समस्या
गर्भपात
मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विकलांग मुलं
मुलांचा अकाळी मृत्यु
विवाहात अडथळे
दांपत्य जीवनात क्लेश
वाईट सवयी
नोकरीत समस्या
कर्ज
 
पितृ दोष निवारण उपाय
पितृदोष दूर करण्याचे उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ दोष निवारण यंत्राचा उल्लेख शास्त्रात करण्यात आला आहे. असे मानले जाते की या यंत्राची संपूर्ण विधीपूर्वक स्थापना केल्यास कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते. हे यंत्र पंडिताच्या मदतीने बसवता येते. यंत्राची स्थापना केल्यानंतर मंत्रासोबत या यंत्राची रोज पूजा करावी. या यंत्रामध्ये पितरांचे सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे, त्यामुळे त्याची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. पितृदोषाच्या शांतीसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला या यंत्राची पूजा करा.
 
पितृ दोष निवारण मंत्र-
ॐ सर्व पितृ देवताभ्यो नमः प्रथम पितृ नाराणाय नमः नमो भगवते वासुदेवाय नमः
 
पितृ दोष निवारण उपाय
शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे.
सोमवारी आकच्या 21 फुलांनी महादेवाची पूजा करावी.
आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावे.
मोठ्याचा मान ठेवावा.
आईचा सन्मान करावा.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात चिंचेचा बांदा आणून घरी ठेवावा.
आपल्या इष्टदेवाची नियमाने पूजा करावी.
ब्रह्मा गायत्री जप अनुष्ठान करावे.
उत्तराफाल्गुनी, उत्तराभाद्रपद किंवा उत्तराषाढ़ा नक्षत्रात ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे.
प्रत्येक अमावस्येला अंधार झाल्यावर बाभळीच्या झाडाखाली जेवण करावे.
अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवावे.
अमावस्येला पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे.
श्राद्ध पक्षात दररोज पितरांना पाणी आणि काळे तीळ अर्पित करावे.
सात मंगलवारी आणि शनिवारी घरात जावित्री आणि केशरची धूप द्यावी.
मंगळ यंत्र स्थापित करुन त्याची पूजा करावी.
दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करावे.
शुक्ल पक्षात प्रथम रविवारी सूर्य यंत्र स्थापित करावे.
सूर्य देवाला नित्य तांब्याच्या पात्रात जल भरुन अर्घ्य द्यावे.
पाच मुखी रुद्राक्ष धारण करावे.
पशु-पक्ष्यांना पोळी खाऊ घालावी.
घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारासह आपल्या पूर्वजांची चित्रे लटकवा.
काली देवीची नियमाने आराधना करावी.
दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

Budhwar puja vidhi : बुधवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

विष्णुस्तवराजः

Tulsi vivah 2024 Upay: तुळशी विवाहाच्या दिवशी यापैकी एक तरी उपाय करा, समृद्धी मिळवा

गौरगणोद्देशदीपिका

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments