आले नवीन यंत्र सामग्री, शेत नांगराया,
महत्व कमी झाले,बैलजोडी चे,किंमत न कोणी कराया,
पिढ्या न पिढ्या चाकरी प्रेमानं बजावली,
झुली खाली व्रण घेऊन, चाकरी म्या केली,
आज ही करतो चाकरी, इमाने इतबारे,
राबलो धन्या संग , कित्ती असो ऊन-वारे,
धनी पण लावतो जीव आम्हा मुक्या जीवांना,
सण साजरा करतो, बैल-पोळा, महत्व देतो बैलांना,
थकतो आम्हीही शेतात राबून, हे माणसा,
पण दिले जर प्रेम तुम्ही,आम्हीं ही चालवतो वसा,
रागावतो धनी, पाठीवर व्रण येती आमच्या,
ते ही करतो सहन,प्रेमा पोटी रे तुमच्या.!