Shiv Mrityunjay Stotra: धार्मिक कथांप्रमाणे जन्मपासून ऋषी मार्कंडेय अल्पायु होते. आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे त्याचे आई-वडील घाबरले होते. नंतर मार्कंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला आणि यमराजांना परत जाण्यास भाग पाडले आणि दीर्घायुष्य प्राप्त केले. याच मार्कंडेयाने पुढे जगाच्या कल्याणासाठी श्रीमृत्युंजयस्तोत्रम् लिहिले.
शिव मृत्युंजय स्तोत्रम् भगवान शंकराची स्तुती आहे. याची रचना ऋषी मार्कंडेय यांनी केली होती ज्याचा उल्लेख पद्म पुराणातील उत्तरखंड मध्ये आहे. शिव मृत्युंजय स्तोत्राचे पठण केल्याने चमत्कारिक फायदे होतात. यामुळे मृत्यूची भीती दूर होते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य वाढते. या कारणास्तव या स्तोत्राचे पठण तरुणांसाठी विशेषतः फायदेशीर आहे.
या स्तुतीमध्ये भगवान शंकराच्या गुणांचे वर्णन केले आहे. असे मानले जाते की जो कोणी भक्त दररोज या स्तोत्राचा पाठ करतो त्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. हे विशेषत: सोमवार, त्रयोदशी, चतुर्दशी किंवा श्रावण महिन्याच्या दिवशी अवश्य पठण करावे.