Dharma Sangrah
✕

कहाणी सोमवारची फसकीची

Webdunia
शनिवार, 30 जुलै 2022 (15:22 IST)
ऐका महादेवा, तुमची कहाणी.
 
आटपाट नगर होतं. त्यांत एक गरीब सवाशीन बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारीं पहाटेस उठावं, स्नानं करावं, पूजा घ्यावी, एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळीं जाऊन मनोभावें पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळीं, ‘जय महादेवा; घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकीं तांदूळ अर्पण करावे.
 
उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं चारी सोमवारीं तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली.
 
पुढं उद्यापनाचे वेळीं तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकरांनीं तिला निरोप पाठविला . “अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाहीं. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे.” पुढं शंकरांनीं तिला अपार देणं दिलं.
 
तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

मार्गशीर्ष गुरुवारी पती-पत्नीमध्ये शारीरिक जवळीक ठेवणे चुकीचे आहे का?

घरात मृत्यू झाल्यानंतर किती दिवस पूजा करू नये? प्रथा आणि नियम समजून घ्या

तुळशी विवाह २०२६ मुहूर्त: तुळशी विवाहाची लगबग सुरू; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments