Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाळलं होतं

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाळलं होतं
, मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (14:30 IST)
'चांदनी' अभिनेत्री श्रीदेवी बॉलिवूडच्या आसमंतातून निखळली. 50 वर्षांच्या कारकिर्दीत श्रीदेवी यांनी चांदनी, लम्हे, चालबाज, नगिना, इंग्लिश विंग्लिश यासारखे एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्यापैकी सदमा चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरली. इतकंच काय तर हा सिनेमा पाहून श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवीने आईशी बोलणं टाळलं होतं. कमल हसनसोबत 'सदमा' चित्रपटात श्रीदेवी यांनी मानसिक आघात झालेल्या एका तरुणीची भूमिका साकारली होती. जान्हवीने सहा वर्षांची असताना हा सिनेमा पाहिला. 'तू एक वाईट आई आहेस. तू त्याच्या (कमल हसन) सोबत चांगलं नाही केलंस' असं म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाळलं होतं. 'मॉम' चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी श्रीदेवी यांनी हा किस्सा सांगितला होता. 'सदमा'त श्रीदेवी यांनी साकारलेली व्यक्तिरेखा आपल्या कारकिर्दीतील सर्वात संवेदनशीलभूमिका असल्याचं श्रीदेवींना मान्य नव्हते. 'एका लहान मुलीसारखी ती व्यक्तिरेखा होती, तर उलट कमल हसन यांची भूमिका अत्यंत इंटेन्स होती.' असं श्रीदेवी म्हणायच्या. जान्हवी ही करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. मात्र चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच या 'मॉम'ने जगाचा निरोप घेतला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा