साहित्य : चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडदाची डाळ, एक चमचा मेथ्या , मीठ.
कृती : रात्री तांदूळ, उडदाची डाळ व मेथ्या हे वेगवेगळे भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ उपसून व कुटून, पीठ चाळून घ्यावे. उडदाची डाळ व मेथ्या उपसून बारीक वाटावे व हा वाटलेला गोळा व दोन-तीन चमचे मीठ तांदळाच्या पिठात घालून व पुरेसे पाणी घालून, पीठ कालवून, दहा-बारा तास ठेवून द्यावे. उत्तप्पा करावयाच्या वेळी पीठ पातळसर कालवून घ्यावे. नंतर तवा तापत ठेवून, तो तापल्यावर त्याच्यावर तेल किंवा तूप सोडून, त्यावर तयार केलेल्या पिठाची जाडसर धिरडी घालावीत.
उत्तप्पा खावयास देताना बरोबर ओल्या डाळीची किंवा इतर दुसरी कोणतीही पातळसर चटणी द्यावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा