साहित्य : शिळी ब्रेड, साखर, वेलची पूड किंवा इसेन्स, तूप 2-3 चमचे, तांदुळाची पिठी, काजू, मनुका, चारोळी, पिस्ता.
कृती :सर्वप्रथम बेडचा बारीक चुरा करून त्यात तांदुळाची पिठी व तूप टाकून मिसळावे. नंतर त्याला एका भांड्यात टाकून कुकराची शिटी न लावता थोडी वाफ द्यावी. भांडे खाली काढून त्यात वेलची पूड किंवा इसेन्स मिसळावे. थंड झाल्यावर त्या मिश्रणात पिठी साखर मिसळून त्याचे लाडू बांधावे. हे लाडू झटपट होतात व चवदार लागतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा