Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्याचा अभिजीत कटके ‘हिंदकेसरी’चा मानकरी

Webdunia
सोमवार, 9 जानेवारी 2023 (08:03 IST)
पुण्याचा सुपुत्र महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके याने तेलंगणाच्या भूमीत नवा इतिहास रचला. हरियाणाच्या सोमवीरचा 5 विरुध्द 0 गुणांनी एकतर्फी फडशा पाडीत देशातील कुस्ती क्षेत्रातील मानाचा  हिदकेसरी पदाचा किताब जिंकला. 
 
हैद्राबाद येथे भारतीय शैली कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या 51 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटके (महाराष्ट्र) विरुद्ध सोमवीर (हरियाणा) यांच्यात हिंदकेसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजीतने सोमवीरला आक्रमणाची संधी मिळून दिली नाही. गुणांची बढत घेऊन सोमवीरवर दबाव वाढवला. 
 
दुसऱ्या फेरीत देखील नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सुचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सुचना दिली. मात्र तीस सेकंदात तो अभिजीतचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजीतला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला मात्र अभिजित पुढे त्याची डाळ शिजली नाही. पाच विरुद्ध शुन्य गुणांची कमाई करून अभिजीतने प्रतिष्ठेची लढत खिशात टाकली. 
 
अभिजीत पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. यापूर्वी अभिजितने महाराष्ट्र केसरी,भारत केसरी किताब जिंकला आहे. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दिनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीतने पटकावला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

सर्वपक्षीय शिष्टमंडळावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

भारताच्या युकी भांब्रीने जोडीदार गॅलोवेसह शानदार कामगिरी उपांत्यफेरीत प्रवेश केला

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments