Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 July 2025
webdunia

Asian Champions Trophy Hockey भारताने पाकिस्तानचा 4-3 ने पराभव करत कांस्यपदक पटकावले

Asian Champions Trophy: India beat Pakistan 4-3 to win bronze medal
, बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:33 IST)
आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला, तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर राहिला. सामन्याच्या सुरुवातीला हरमनप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल करत भारताला पाकिस्तानविरुद्ध आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी पहिला गोल केला. यानंतर पाकिस्तानच्या अफराजने पूर्वार्धात गोल करत स्कोअर बरोबरीत आणला. खेळाचा पहिला हाफ संपला तेव्हा भारत आणि पाकिस्तान 1-1 ने बरोबरीत होते.
 
हाफ टाईमनंतर खेळ सुरू झाला तेव्हा पाकिस्तानने आक्रमक खेळ सुरू केला आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल करत भारताच्या पुढे गेला. पाकिस्तानसाठी अब्दुल राणाने दुसरा गोल केला.
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीत ओमिक्रॉनचा इशारा, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवांवर बंदी; कोणते नियम वाचा