Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Asian Games 2023: मराठमोळ्या ओजसची सुवर्णभरारी

ojas deotale
, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (09:58 IST)
Asian Games 2023 एशियन गेम्समध्ये भारताच्या ज्योती वेन्ननने आणि ओजस देवतळेने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदके पटकावली आहेत. 

गुरुवारी (5 ऑक्टोबर) कंपाऊंड तिरंदाजीत पुरुषांच्या सांघिक स्पर्धेच्या फायनलमध्ये ओजस आणि प्रथमेशनं दिग्गज तिरंदाज अभिषेक वर्माच्या साथीनं सुवर्णपदक मिळवलं.
 
या तिघांनी बलाढ्य दक्षिण कोरियावर 235-230 अशी मात केली.
 
त्याआधी महिला टीमनं चायनीज तैपेईला हरवत सुवर्णपदक मिळवलं. आदिती, परनीत कौर आणि ज्योती वेन्नमचा समावेश असलेल्या भारतीय टीमनं 230-228 असा विजय मिळवला.
 
बुधवारी ओजसनं ज्योतीच्या साथीनं मिश्र तिरंदाजीतही सुवर्णपदक मिळवलं होतं.
 
ओजस देवतळे मूळचा नागपूरचा आहे. तो साताऱ्यात दृष्टी तिरंदाजी अकॅडमीमध्ये प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 
अदिती स्वामी साताऱ्याचीच असून दृष्टी अकॅडमीमध्येच तिरंदाजीचं प्रशिक्षण घेते आहे. . अवघ्या 17 वर्षांच्या अदितीनं यंदा ऑगस्टमध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेतचं विजेतेपद मिळवलं होतं.
 
तर प्रथमेश जावकर मूळचा बुलढाण्याचा असून तिथेच त्यानं तिरंदाजीचे धडे गिरवले होते.
 
तिरंदाजीवर दक्षिण कोरियाचं वर्चस्व पाहता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणं ही मोठी गोष्ट मानली जाते. तसंच कंपाऊंड तिरंदाजीचा ऑलिंपिकमध्ये समावेश नसल्यानं आशियाई क्रीडा स्पर्धेतलं पदक हे अतिशय मानाचं मानलं जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स रिटेलमध्ये 0.59% इक्विटीसाठी ₹4,966.80 कोटींची गुंतवणूक अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी करणार आहे