सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने ताज्या बॅडमिंटन क्रमवारीत मोठी कामगिरी केली आहे. सात्विक-चिराग जोडीने मंगळवारी थायलंड ओपनमध्ये विजय मिळवून पुरुष दुहेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत पराभवानंतर भारतीय जोडी तिसऱ्या स्थानावर घसरली होती. यानंतर सात्विकच्या दुखापतीमुळे या जोडीने चीनमधील आशिया चॅम्पियनशिपमध्ये वॉकओव्हर दिला.
भारतीय जोडीने थायलंड ओपनमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि चीनच्या चेन बो यांग आणि लियू यी यांच्यावर सरळ गेममध्ये विजय मिळवून हंगामातील दुसरे विजेतेपद पटकावले. या जोडीने 99670 गुणांसह BW च्या ताज्या क्रमवारीत दोन स्थानांवर चढून पाच आठवड्यांनंतर पुन्हा अव्वल स्थान मिळवले.
सिंधूची 15व्या स्थानावर घसरण झाली आहे. एचएस प्रणॉयने नववे मानांकन कायम ठेवले असून पुरुष एकेरीच्या टॉप 10 मध्ये तो एकमेव भारतीय आहे. लक्ष्य सेन तीन स्थानांनी घसरून 14व्या स्थानावर आला आहे. किदाम्बी श्रीकांत (26वे), प्रियांशू राजावत (33वे) प्रत्येकी एक स्थान घसरले तर किरण जॉर्ज 36व्या स्थानावर घसरले.
महिला दुहेरी प्रकारात तनिषा क्रास्टो आणि अश्विनी पोनप्पा ही 19व्या क्रमांकावर असलेली भारतीय जोडी आहे. या जोडीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी एका स्थानाने घसरून जगात 29व्या स्थानावर पोहोचली आहे. मिश्र दुहेरीत, सतीश कुमार करुणाकरन आणि आद्य वारियथ हे तीन स्थानांनी जागतिक क्रमवारीत 39 व्या स्थानावर पोहोचले