भारतीय क्रीडा विश्वाला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. बेंगळुरू येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत एका खेळाडूचा मृत्यू झाला. 9-10 जुलै रोजी झालेल्या या स्पर्धेत किक बॉक्सर नितीन सुरेश याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण गुरुवारी त्याचे निधन झाले. तो 23 वर्षाचा होता. नितीनचे वडील आणि प्रशिक्षक यांनी स्पर्धेच्या आयोजकांवर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय. स्पर्धा सुरू असताना रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. अशा प्रकारच्या मार्शल आर्ट स्पर्धेसाठी गरजेची असते. जर वेळेत उपचार मिळाले असते तर नितीनचा जीव वाचला असता. दरम्यान या घटनेनंतर आयोजक फरार झाले आहेत. राष्ट्रीय किक बॉक्सिंग असोसिएशने या स्पर्धेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे.