भारतीय बॉक्सर निखत जरीनने गुरुवारी फ्लायवेट अंतिम सामन्यात थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा पराभव करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 52 किलो गटातील हा सामना तुर्कीतील इस्तंबूल येथे झाला.
मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा केसी यांच्यानंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी निखत जरीन ही पाचवी भारतीय महिला बॉक्सर आहे.
विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निखत म्हणाली, "हा विजय माझ्या आई-वडिलांचा आहे. जेव्हा मी माझ्या आईला फोन करायचे तेव्हा ती माझ्या विजयासाठी प्रार्थना करत असे.
तर मनीषा मौन (57 किलो) आणि नवोदित परवीन हुडा (63 किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.