टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोर्गोहेनच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला बॉक्सिंग संघ जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी गुरुवारी पहाटे तुर्कीला रवाना झाला. 6 ते 21 मे या कालावधीत इस्तंबूल, तुर्की येथे जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप होणार आहे.
भारतीय संघ याआधी 5 मेपर्यंत इस्तंबूलमध्येच सराव शिबिरात सहभागी होणार आहे. शिबिरात भारतीय संघ कझाकिस्तान, तुर्की, अल्जेरिया, पनामा, लिथुआनिया, मोरोक्को, बल्गेरिया, सर्बिया, डोमिनिका रिपब्लिक आणि आयर्लंड या देशांतील बॉक्सर्ससोबत सराव करणार आहे.
संघ पुढीलप्रमाणे: नीतू (48 किलो), अनामिका (50 किलो), निखत झरीन (52 किलो), शिक्षा (54 किलो), मनीषा (57 किलो), जास्मिन (60 किलो), परवीन (63 किलो), अंकुशिता (66 किलो), लोव्हलिना (70 किलो) , स्वीटी (75 किलो), पूजा राणी (81 किलो), नंदिनी (81 किलोपेक्षा जास्त).