Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Chess Champion: 17 वर्षांचा रौनक बनला वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ विश्व विजेता, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

Webdunia
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (10:48 IST)
Chess Champion: भारताचा ग्रँडमास्टर रौनक साधवानी, 17, इटलीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंडर-20 वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन बनला. महाराष्ट्रातील नागपूरच्या रौनकने 11व्या फेरीत 8.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे रौनकला या स्पर्धेत खेळण्यासाठी व्हिसा मिळण्यात अडचणी आल्या, पण त्याची एकाग्रता बिघडली नाही.
 
या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौनक साधवानी यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, रौनकने आपल्या सामरिक प्रतिभा आणि कौशल्याने जगाला चकित केले आणि देशाचा गौरव केला. "रौनक साधवानीचे FIDE वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2023 मधील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन," पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले. त्याच्या सामरिक प्रतिभा आणि कौशल्याने जगाला चकित केले. त्यामुळे देशाचा गौरवही झाला आहे. तो आपल्या असामान्य कामगिरीने आपल्या देशातील तरुणांना प्रेरणा देत राहो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. 
 
अव्वल मानांकित रौनकच्या मोहिमेची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या आणि पाचव्या फेरीत त्याला अत्यंत खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला. पाच फेऱ्यांपर्यंत फक्त तीन गुण मिळवता आले. मात्र, अंतिम फेरीत जर्मनीच्या टोबियास कोलेचा पराभव करून तो विजेता ठरला.
 
 




Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments