Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Commonwealth Games:नीरज चोप्रा राष्ट्रकुल 2022 स्पर्धेतून बाहेर, भारताला मोठा धक्का

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (12:54 IST)
28 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. याच्या दोन दिवसांपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी ही माहिती दिली.
 
अलीकडेच नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्ज (2003) नंतर असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. मात्र, त्याच स्पर्धेत त्याला दुखापतही झाली. नीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. फायनलमध्ये नीरजही मांडीला पट्टी बांधताना दिसले.
 
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाले  - चौथ्या थ्रोनंतर मला मांडीत अस्वस्थता जाणवत होती. चौथ्या थ्रोनंतर मला पाहिजे तितके जोरात धक्का मारता आला नाही. नीरजच्या या वक्तव्याने तमाम देशवासियांची चिंता वाढली होती. 
 
राष्ट्रकुलमध्ये स्पर्धा कमी आणि पदक जिंकण्याची शक्यता जास्त असते. अशा स्थितीत नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्याचे मानले जात होते, मात्र त्याच्या दुखापतीमुळे भारताचे पदक गमावले आहे. 
 
जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेनंतर, नीरज चोप्राचा एमआरआय स्कॅन करण्यात आला, ज्यामध्ये ग्रोईंन इंज्युरी ची बाब आढळून आली. अशा परिस्थितीत नीरज चोप्राला  जवळपास एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळेच तो 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राचा सामना 5ऑगस्ट रोजी होणार होता, त्याच दिवशी भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आता या क्षेत्रात भारताच्या आशा आशा डीपी मनू आणि रोहित यादव यांच्याकडून आहेत. आता हे दोघेही भालाफेकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

सर्व पहा

नवीन

अपराजिता विधेयक महाराष्ट्रातही आणावे, शरद पवार यांनी ममता बॅनर्जींची बाजू मांडली

Dr.Sarvepalli Radhakrishnan Quotes in Marathi डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल विचार

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची विशेष तयारी, पुणे जिल्ह्यात 82 रुग्णवाहिका तैनात

काँग्रेसने उद्धव ठाकरेंची मागणी फेटाळून लावली, केले शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन

रशियन मुलगी मिळेल, रुम नंबर 105 वर या, हॉटेलमध्ये फोन करून अधिकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ बनवला

पुढील लेख
Show comments