Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोकोविच, सेरेना पुढच्या फेरीत

Webdunia
गुरूवार, 23 जानेवारी 2020 (15:50 IST)
गतविजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइचा 6-2, 6-4 ने पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या एकेरी गटातील तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. या ठिकाणी तिचा सामना 15 वर्षीय कोको गॉ हिच्याशी होणार आहे. तर नोवाक जोकोविच आणि सेरेना विलियम्स यांनीही आपापल्या सामन्यात सहज विजय नोंदवत पुढची फेरी गाठली आहे. 
 
कोकोने अनुभवी सोराना क्रिस्टीचा 4-6, 6-3, 7-5 ने पराभव केला आहे. तिने मागील वर्षी विम्बल्डनमध्ये सातवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन व्हिनस विलियम्सला पराभूत केले आहे.
 
सेरेनाने स्लोवेनियाची तमारा जिदानसेकवर सहज विजय मिळवत तिसर्‍या फेरीत प्रवेश पक्का केला आहे. पूर्णपणे लय नसूनसुध्दा या 38 वर्षी खेळाडूला जागतिक क्रमवारीत 70 व्या स्थानी असलेल्या जिदानसेकचा 6-2, 6-3 ने पराभव करताना जास्त कसरत करावी लागली नाही.
 
आठव्या मानांकित सेरेनाला पुढच्या फेरीत चीनच्या 27 व्या मानांकित वांग कियांगशी भिडावे लागणार आहे. तर 2019 ची उपविजेती कॅरोलिन वोजनियाकीने युक्रेनच्या डायना यास्ट्रेम्सकाचा 7-5, 7-5 ने पराभव केला. जगातील क्रमांक एकची खेळाडू अ‍ॅश्ले बार्टीने पोलोना हर्कोगचा 6-1, 6-4 ने पराभव केला.
 
पुरुषांच्या गटातून जोकोविचने जपानच्या थेट प्रवेश मिळालेल्या तत्सुमा इतोचा 6-1, 6-4, 6-2 ने पराभव केला. युनानच्या स्टेफानोस सितसिपासला नशिबाची साथ लाभली. कारण त्याचा प्रतिस्पर्धी फिलिपने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. युएस ओपनचा माजी विजेता मारिन सिलिचने फ्रान्सच्या बेनोइट पिरेविरूध्द पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात विजय नोंदवला. तर पुन्हा एकदा उपान्त्य फेरीपर्यंततचा प्रवास करणार्‍या मिलोस रॉनिकने चिलीच्या ख्रिस्टियन गारीनचा सरळसेटमध्ये पराभव केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

J&K : किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, महाराष्ट्रातील एक जवान शहीद

LIVE: धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त, आमदार अनिल गोरेंनी केला आरोप

धक्कादायक, 70 वर्षीय रुग्णाच्या पोटातून 8125 दगड काढले, एक तास चालली शस्त्रक्रिया

महाराष्ट्रात पावसाचा कहर, दोन दिवसांत 20 हून अधिक जणांचा मृत्यू, मुंबईत अलर्ट

पुढील लेख
Show comments