Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत फ्रांसचा जिल्स सिमॉन अव्वल

Webdunia
शनिवार, 6 जानेवारी 2018 (14:57 IST)
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत फ्रांसच्या जिल्स सिमॉन याने अव्वल मानांकित मरिन चिलीचवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पाहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 89व्या स्थानावर असलेल्या फ्रांसच्या जिल्स सिमॉन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा 1-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.
 
 
तब्बल 1 तास 51 मिनिटे चाललेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात पहिल्या सेटमध्ये क्रोएशियाच्या मरिन चिलीच आपले वर्चस्व कायम राखले. या सेटमध्ये चिलीच याने चपळाईने व आक्रमक खेळ केला.दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये चिलीच याने सिमॉनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस रोखत हा सेट 6-1 असा सहज जिंकून सामन्यात 1-0अशी आघाडी घेतली. हा सेट 28मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये सामन्यात पिछाडीवर असलेल्या सिमॉन याने जबरदस्त कमबॅक करत दुसऱ्याच गेममध्ये चिलीचची सर्व्हिस भेदली व सामन्यात 2-0अशी आघाडी घेतली. सिमॉनच्या ताकदवान ग्राउंडस्ट्रोक व सर्व्हिसेसमोर अनुभवी चिलीच याची खेळी निष्प्रभ ठरली. यानंतर सिमॉन याने चौथ्या गेममध्ये चिलीचची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सिमॉन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.सिमॉन याने पहिल्या, सातव्या गेममध्ये चिलीचची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 अशा फरकाने जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाउल पुढे टाकले.
 
 स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी:
मरिन चिलीच(क्रोएशिया)(1) पराभूत.वि. जिल्स सिमॉन(फ्रांस)  6-1, 3-6, 2-6 
पुण्याहून अभिजित देशमुख

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments