बिहारमधील नव्याने बांधलेल्या राजगीर हॉकी स्टेडियमवर 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. नवनीत कौरची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी रांची येथे झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते मात्र तेव्हापासून संघाची कामगिरी घसरली आहे. या खंडीय स्पर्धेत संघाला सध्याच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंडसह अन्य पाच देशांच्या कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.
भारत 11 नोव्हेंबरला मलेशियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. संघ निवड आणि स्पर्धेसाठी त्यांच्या तयारीबद्दल, मधल्या फळीतील खेळाडू सलीमा म्हणाली, 'आणखी एका मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणे ही एक चांगली भावना आहे. आम्ही कठोर प्रशिक्षण घेतले आहे. आमच्याकडे अनुभवी खेळाडू आणि युवा प्रतिभा असलेला मजबूत संघ आहे. आमचे जेतेपदाचे रक्षण करणे आणि मागील वर्षी आम्ही दाखवलेल्या उत्कटतेने आणि निर्धाराने खेळणे हे आमचे ध्येय आहे.
भारतीय संघ:
गोलरक्षक : सविता, बिचू देवी खरीबम.
बचावपटू : उदिता, ज्योती, वैष्णवी विठ्ठल फाळके, सुशीला चानू पुक्रंबम, इशिका चौधरी.
मिडफिल्डर: नेहा, सलीमा टेटे, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनीलिता टोप्पो, लालरेमसियामी.
फॉरवर्ड: नवनीत कौर, प्रीती दुबे, संगीता कुमारी, दीपिका, सौंदर्य डुंगडुंग.