Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताच्या महिला बुद्धिबळ संघाची विजयाची हॅट्‌ट्रिक

Webdunia
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (17:05 IST)
भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला संघानेही आशियाई नेशन्स ऑनलाइन बुद्दिबळ स्पर्धेत सलग तीन विजय प्राप्त करत हॅट्‌ट्रिक साधली.
 
या स्पर्धेत आता भारताच्या महिला संघाचा सामना कझाकिस्तानशी होणार आहे. महिला संघाने या सलग तीन विजयांसह स्पर्धेच्या उपान्त्पूर्व फेरीत प्रवेश केला.
 
भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात फिलिपिन्सचा 3-1 असा पराभव केला. त्यानंतरच्या फेरीत कझाकिस्तानवर 2.5-1.5 अशी मात केली. तर नंतर व्हिएतनामचा 2.5-1.5 असा पराभव केला. या तीनही विजयांत महत्त्वाचा वाटा आर. वैशाली व पी. वी. नंदिथाचा होता. तिने फिलिपिन्स व कझाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व राखल्यामुळेच भारताची सरशी झाली.
 
मत्र, कझाकिस्तानविरुद्ध भक्ती कुलकर्णीचा डाव बरोबरीत संपला. व्हिएतनामविरुद्धच्या लढतीत वैशाली व गोम्स यांना विजय मिळवता आले. भारताकडून नवव्या फेरीअखेर वैशालीनेच आपली गुणवत्ता सिद्ध करताना सर्वाधिक 6.5 गुण प्राप्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कानपूरमध्ये ट्रेन रुळावरून उतरवण्याचा आणखी एक प्रयत्न,लोको पायलट आणि असिस्टंटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली खास भेटवस्तू

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments