Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोश्ना- दीपिका यांच्यात फायनल

Webdunia
एशियन स्कवॉश चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंमध्येच अंतिम फेरी रंगणार आहे. भारताच्या दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील महिला गटाचे विजेतेपद भारतीय खेळाडूच मिळवणार हे निश्चित झाले आहे.
 
महिला एकेरीच्या पहिलया उपांत्य लढतीत दीपिकाने सनसनाटी विजय मिळवला. चौथ्या मानां‍‍कित दीपिकाने अग्रमानांकित अॅनी अयूवर 11-9, 7-11, 11-9 असा विजय मिळवला, तर दुसर्‍या उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित चिनप्पाने सहाव्या मानांकित टाँग त्स थिंगवर 11-6, 11-4, 11-8 असा विजय मिळवला.
 
दीपिकाने जागतिक क्रमावरीत अकाराव्या स्थानावर असणार्‍या अॅनीविरूद्ध जबरदस्त कामगिरी केली. तिने 50 मिनिटांत अॅनीचे आव्हान परतवून ‍लावले. पहिल्या गेममध्ये दीपिकाने वर्चस्व राखले. ही गेम जिंकून दीपिकाने आश्वासक सुरूवात केली. यानंतर अॅनीने दुसरी गेम जिंकून बरोबरी साधली. यानंतर मात्र, दीपिकाने तिला वर्चस्व मिळू दिले नाही. दीपिकाने आक्रमक खेळ केला.
 
दुसरीकडे जोश्नाने हाँगकाँगच्या विंगला फारशी संधीच दिली नाही. पहिल्या दोन गेम तिने सहज जिंकल्या. तिसर्‍या गेममध्ये विंगने आव्हान राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण जोश्नाने हात-तोंडाशी आलेला विजय हुकणार नाही, याची काळजी घेतली.
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments